*३०० युनिटचे वीज बिल सरसकट माफ करावे*
*उद्रेक होण्याचा ईशारा*
प्रतीनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
नरखेड– टाळेबंदीच्या काळात वीज महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना एकदम तीन महिन्यांचे भरमसाठ वीज बिले पाठवून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्य शासनाने मध्यस्थी करून वीज नियामक आयोगाकडून सर्वसामान्यांचे ३०० युनिटचे वीज देयके माफ करावे. अन्यथा सर्वसामान्य व शेतकरी वीज महावितरण कंपनीच्या प्रत्येक कार्यालयासमोर वीज देयकांची होळी करून चांगलाचं उद्रेक होणार असल्याचा ईशारा निवेदनान्वये श्रीराम युवा सेना जिल्हाध्यक्ष मयुर दंढारे यांनी वीज महावितरण कंपनी काटोलचे मुख्य अभियंता मळसाने व नरखेड तहसिलदार हरिश गाडे यांना दिला आहे.
याबाबत सविस्तर व्रुत्त असे की, लाँकडाऊन काळात एकीकडे सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे मजूरीशिवाय जीवन जगणे कठी झाले असूनही, वीज महावितरण कंपनीने एकत्र तीन महिन्यांचे भरमसाठ वीज देयके पाठवून चांगलाचं बडगा उभा केला आहे. शिवाय बाजारातील सर्व दुकाने महिनाभर बंद असूनही त्यांचेवर ४ ते ५ हजार रुपयांच्या वीज देयकांची आकारणी करून वीज महावितरण कंपनीने आपली सीमाचं ओलांडल्याची सर्वत्र ओरड आहे. निवेदनान्वये प्रामुख्याने ३०० युनिट पर्यंतचे वीज देयके माफ करावे. उर्वरीत वीजबिल भरण्यासाठी सवलत द्यावी. यावर संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. दरम्यान निदर्शनात आले की, राज्य शासन १६ टक्के शुल्क घेते. ते शुल्क राज्य सरकार परस्पर माफ करणार काय? असा सवालही उठवण्यात आला. पण वीज देयके माफ करण्याचा अधिकार राज्य सरकार तथा महावितरण कंपनीला नाही. वीज देयके माफ करण्याचा अधिकार केवळ वीज नियामक आयोगाला आहे. यात राज्य शासनाने पुढाकार घेऊन भरमसाठ वीज देयके माफ करून जनसामान्य व शेतकऱ्यांच्या खिशाला आधार द्यावा, अशी मागणी सर्वत्र जोर धरत आहे.
टाळेबंदीच्या काळातही शेतकऱ्यांनी जीवाची परवा न करता भर उन्हात शेतींची मशागत करून मोठ्या आशेने पावसाळ्यात पीक पेरणी केली. बी-बियाणे कंपनींचे निक्रुष्ट दर्जाचे बियाणे मात्र उगवलेचं नाही. तरी सुद्धा वीज महावितरण कंपनीने त्यांचे माथी भरमसाठ वीज देयके मारलीत. याशिवाय शेतीत बियाणेचं उगवली नसल्याने पुरते पिंजलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडेचं मोडले आहे. त्यांचा व सर्वसामान्यांच्या संयमाचा बांध फुटून मोठा उद्रेक होण्याचा ईशाराही निवेदयान्वये संबंधीतांना देण्यात आला आहे. कोव्हीड प्रकोपामुळे ईतर राज्यांत वीजबिल माफ झाले असूनही महाराष्ट्रात ३०० युनिटपर्यंतचे वीज देयके १० दिवसांचे आत माफ करावे अन्यथा जनसामान्यांचे पावरग्रिड निकामी व्हायला वेळ लागणार नाही याची दखल उर्जामंत्र्यांनी घ्यावी, असेही निवेदनात नमूद आहे.
Maharashtra News Media सच की आवाज