*झुल्लर गावात सम्पन्न झाला भुलबा भुलबिचा विवाह सोहळा संपन्न*
*जुनी रुढी परंपरा कायम*
उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : फार पूर्वीपासून ग्रामीण भागात भुलबा भुलबी च्या लग्नाची प्रथा प्रचलित आहे. त्यानुसार मौदा तालुक्यात अजूनही ग्रामीण भागात हा लग्न सोहळा साजरा केला जातो. तालुक्यातील झुल्लर येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश मोटघरे यांच्या पुढाकाराने झुल्लर येथे हा विवाह सोहळा सम्पन्न झाला. विशेष म्हणजे या सोहळ्यात सांकेतिक वर-वधू पिता असतात. परंपरागत ब्यांड वाज्याच्या गजरात वरा कडील मंडळी वधू मंडपी येतात. मंगलाष्टके होतात, यात नवरी नवरदेव यांचे छोटे पुतळे तयार केले जातात. व बोवल्यावर ठेऊन लग्न सोहळा सम्पन्न होतो.
विशेष म्हणजे गावातली महिला, लहान मुले यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लग्न समारंभ पार पडल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम पार पडला. ग्रामीण भागात वर्गणी करून हा लग्नसोहळा पार पाडला जातो. विशेष म्हणजे कोरोनाचे संकट लक्षात घेता गावातील नागरिकांनी सोशल डिस्टन्स चे सर्व नियम पाळून झुल्लर वासीयांनी हा उत्सव मोट्या आनंदात साजरा केला.
Maharashtra News Media सच की आवाज