*मौदा पत्रकार संघातर्फे एनटीपीसीचे जनसम्पर्क अधीकारी समीर यांचा सेवानिवृत्ती सत्कार*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : मौदा येथिल एनटीपीसी मध्ये कार्यरत जनसम्पर्क अधिकारी समिर कुमार लाल नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्या निमित्य मौदा पत्रकार संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष दयाल नानवटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पतिनिधी संतोष सेलोटे, कार्याअध्यक्ष संजय गिरडे, तुकाराम लुटे, दिलीप इंगोले, कैलास बनकर, पुरुषोत्तम डोरले, रघुनाथ शहारे, गजेंद्र नासरे, शैलेश रोशनखेडे उपस्थित होते. यावेळी सत्कारमूर्ती समिरलाल यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व सर्व उपस्थित पत्रकारांनी समिरलाल यांना पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.
Maharashtra News Media सच की आवाज