Breaking News

*बिग ब्रेकिंग* *आर्वी नगरपरिषद चे अध्यक्ष सह महावितरण कर्मचाऱ्यांस कोरोना ची लागन* *आर्वी सह वर्धा जिल्ह्यात खळबळ*

*बिग ब्रेकिंग*

*आर्वी नगरपरिषद चे अध्यक्ष सह महावितरण कर्मचाऱ्यांस कोरोना ची लागन*

*आर्वी सह वर्धा जिल्ह्यात खळबळ*

आर्वी प्रतिनिधि- विश्वास बांगरे

आर्वी– *कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासन सज्ज परंतू सामान्य नागरिक “अपुन को क्या” च्या भुमिकेत*

आज आर्वी येथे कोरोना रुग्ण आढळल्याने सर्व नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे की आर्वी येथील कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीचे हे नगर परिषद आर्वी चे अध्यक्ष या पदावर कार्यरत असून त्यांना घरी होम कॉरंटाइन करण्यात आले अशी प्राथमिक माहिती मिळत आहे

आर्वी नगरपरिषद क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नगरपरिषद आर्वी क्षेत्रात *दिनांक 6 जुलै 2020 सकाळी 6 वाजेपासून ते 8 जुलै 2020 रात्री 12 वाजेपर्यंत* या तीन दिवसाकरीता कडकडीत बंद ठेवण्यात येत आहे. यावेळी
मेडीकल दुकान, दवाखाने, दूध वितरण व घरपोच दूध सेवा, वर्तमानपत्र ह्या सेवा सुरू राहतील. या व्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद राहतील नागरिकांनी कुठल्याही कारणाने बाहेर पडू नये.

वरील आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था, समूह यांना साथ प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, 269, 270, 271 नुसार शिक्षेस पात्र असलेल्या अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल . याची गांभीर्याने नोंद घ्यावी.असे हरीष धार्मीक(उपविभागीय दंडाधिकारी) आर्वी यांनी दिली आहे

शासनाच्या नियमानुसार कोरोना विषाणू चे लक्षणे आढळल्यास रुग्णाला आयसोलेट करण्यात येते मात्र नगरपरिषद आर्वी चे यांना होमकोरंटाईन का करण्यात आले आहे याची चर्चा नागरिकांमध्ये जोरात सुरू आहे

*वर्धा जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे.*
रविवारी रात्री तीन जणांची रिपोर्ट आरोग्य विभागाला पॉजीटिव प्राप्त झाली आहे.यामध्ये आर्वीच्या नगराध्यक्षासह महावितरणच्या कर्मचा-याचा समावेश आहे.अन्य एक रिपोर्ट दहा दिवसांच्या उपचारानंतर देखील पॉजीटिव आल्याने डॉक्टर सुद्धा अचंबित झाले आहे.मागील चार दिवसांत 12 जण कोरोना बाधित झाले आहे.महावितरणचा कर्मचारी रायगड जिल्ह्यातून परतला होता.यापुर्वी महावितरणचे आठ कर्मचारी पॉजीटिव सापडले आहे.एकूण वीस कर्मचारी रायगडला गेले होते.नगराध्यक्ष पॉजीटिव सापडल्याने आर्वी शहरात तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे.सावंगी रूग्णालयात एका कोरोना बाधित रूग्णावर मागील दहा दिवसांपासून उपचार सुरू होते.दहा दिवसांच्या उपचारानंतर त्याचे स्त्राव पुन्हा तपासाणीसाठी पाठविण्यात आले होते.त्याचा सुद्धा रिपोर्ट पॉजीटिव आल्याची माहिती आहे.  

 

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …