*राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमित्ताने वु्क्षारोपन*

कुही प्रतिनिधी- निखील खराबे
कुही:- तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज कुही तालुक्यातील गाव गावात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या जन्मदिनानिमित्त कुही येथील पोलिस ठाण्याच्या आवारात, सावळी, ठाणा, भटरा ,तसेच कुही तालुक्यातील गावोगावी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले. जगात आणि देशात सर्वत्र कोरोना चा हाहाकार असल्याने सर्वांनी विशेष काळजी घेणे आणि स्वच्छ सुरक्षित राहणे इत्यादी बद्दल शासन प्रशासन नागरिकांना सूचना देत असून कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून माझा वाढदिवस साजरा करावा असे आव्हान बच्चू कडू यांनी केली होती. त्यामुळे कुही तालुका येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुठलेही पोस्टर फलक न लावता आज वृक्षारोपण करून राज्यमंत्री बच्चु कडू यांचा वाढदिवस साजरा केला. कुही येथे प्रामुख्याने कुहीचे पोलीस निरीक्षक सोनटक्के सर ,समाधान भाऊ पवार , सचिन कवाडे सर उपस्थित होते तर तालुक्यात संजय अतकरी, प्रहार कुही तालुका प्रमुख, कुही शहर प्रमुख मोहन धोटे ,रोशन बांते,राम चर्चेरकर, युवराज,राहुल लांजेवार सोमेश्वर अतकरी ,शेषराव दुधपचारे व गावोगावचे प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज