Breaking News

*मौद्यात पतंजली योग समिती तर्फे गुरुपौर्णिमा समारोह संपन्न* *वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा*

*मौद्यात पतंजली योग समिती तर्फे गुरुपौर्णिमा समारोह संपन्न*

*वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : आपल्या लाडक्या गुरूची आठवण म्हणून मौदा येथिल पतंजली योग समिती द्वारा मंगळवार दि. ७ जूलै रोजी सकाळी ८ वाजता मौदा स्थित बाळबुधे वृंदावन लाॕन मध्ये ‘गुरूपौर्णिमा’ समारोह साजरा करण्यात आला. तसेच किसान सेवा समितीचे तालुका प्रभारी नरेंद्र बाळबुधे यांच्या वाढदिवस वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

कोविड-19 अंतर्गत शासन नियमानूसार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनमंत्री प्रकाश कोरडे हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून दिनेश ढोबळे, प्रकाश पांढरे, यांनी गुरुमहिमावर मार्गदर्शन केले. व योगशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुलाब तुरनकर यांच्या सेवानिवृत्ती बद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच किसान सेवा समिती मौदा तालूका प्रभारी नरेंद्र बाळबूधे यांचा वाढदिवस हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. सर्व उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले.

सर्वांना अल्पोपहार व आयुर्वेदीक काढा वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निरंजन केळकर, एकनाथ कापगते, मुरलीधर टोनपे, शिला तुरनकर, मनिषा राकेश, ज्योती मस्के यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक देवेंद्र सोनटक्के यांनी केले तर सुत्र संचालन मोनिका ठाकरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.डॉ सुनिल बोरकर यांनी केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …