Breaking News

*चाचेर येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे समापन* *कृषी सभापती आपला शिवारात* *कृषी सभापतींनी केली शेतपीकांची पाहणी*

*चाचेर येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे समापन*

*कृषी सभापती आपला शिवारात*

*कृषी सभापतींनी केली शेतपीकांची पाहणी*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती दि १ जुलै हे कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते. या कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी कृषी सभापती आपल्या शिवारात हा उपक्रम नागपूर जिल्ह्यात चांगलाच राबवला.

या कार्यक्रमाचे समापन दि.७ जुलै रोजी तालुक्यातील चाचेर येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषद कृषी सभापती तापेश्वर वैद्य, जिल्हा कृषी अधिकारी पंकज लोखंडे, जिल्हा मोहीम अधिकारी प्रवीण नागरगोजे, मौदा तालुका कृषी अधिकारी रविकांत वासनिक, जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे, जिल्हा परिषद सदस्या शालिनी देशमुख मौदा पंचायत समिती सभापती दुर्गा ठवकर, उपसभापती रक्षा थोटे, पं.स. कृषि अधिकारी संध्या मोकदम, पशुधन विकास अधिकारी डॉ.रीना रामटेके, पं.स. सदस्या वंदना सिंगनजुडे, वनिता वैद्य, मुकेश अग्रवाल, स्वप्नील श्रावणकर, अनिल बूराडे, महेश कलारे, राजेश ठवकर, चीन्नु यागंट्टी, बाल्या देशमुख, ज्ञानेश्वर वानखेडे, रजत महादूले, रमेश पिसे, श्रीहरी थोटे, आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मार्गदर्शन करते वेळी सभापती तापेश्वर वैद्य म्हणाले की शेतकऱ्यांना पीक उत्पादन खर्चात बचत करून अधिक उत्पादन घेणे बाबत मार्गदर्शन करून खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या अनेक पिकाबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर करतेवेळेस जिथे तणाचे प्रमाण कमी असल्यास मजूर व डवरणीची व्यवस्था असल्यास तणनाशकाची फवारणी टाळावी. सोयाबीन पिकांमध्ये तणनाशकाची फवारणी करताना स्वतंत्र पंप वापरण्याची व्यवस्था नसेल तर पावर स्प्रे, नैपसैप पंप, बॅटरी पावर ट्रॅक्‍टरचलित फवारणी, यंत्राच्या पाण्याची टाकी व नळ या सहीत तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्याव्यात त्याचप्रमाणे शेती करताना नवीन नवीन तंत्राचा वापर करून उत्पन्न जास्त खर्च कमी या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी जास्त लक्ष देऊन विविध पद्धतीने शेती करावी त्याच प्रमाणे विविध शेती पिकावर सभापती वैद्य यांनी मार्गदर्शन केले.

मौदा तालुक्यातील चाचेर येथील मोहित शेतकरी समूह या गटामार्फत अनुदानावर भात गोडावून बांधकाम करण्यात आले. या संपूर्ण गोडाऊन ची पाहणी सुद्धा सभापती तापेश्वर वैद्य व अधिकार्यांनी केली. मौदा तालुक्यातील काही भागात कृषी सभापती आपल्या शिवारात हे उपक्रमाला सुरुवात झाल्याने शेतकर्‍यांनी शेताकडे धाव घेतली. नागपूर जिल्ह्यात हे कार्यक्रम चांगल्या प्रकारे सुरू असल्याने शेतकऱ्यांना नवी संजीवनी मिळाली‌. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेत पिकांची पाहणी त्याचप्रमाणे नवनवीन पद्धतीने करत असलेल्या पिकांचे कृषी सभापती यांच्याकडून पाहणी करून हा कार्यक्रम जिल्ह्यातील राबविण्यात आला. अशाप्रकारे कार्यक्रमाचे चाचेर येथे समापन करण्यात आले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …