*कृषी विक्रेत्यांच्या तीन दिवसीय राज्यव्यापी बंद*
*महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्ट्री सीड डीलर्स असोसिएशन चा पुढाकार*
*विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करणे बंद करा,गुन्हेगार आम्ही नाही तर सीड निर्माते*

*कु्षी केन्द्र संचालकांची आर्तहाक*
* सावनेर प्रतिनिधी सुरज सेलकर/दिनेश चौरसिया*
*सावनेरः उगवण न झालेले बियाणे बोगस बियाणे खत याबाबत निर्माण होत असलेल्या तक्रारीसाठी कृषी विक्रेत्यास जबाबदार धरून गुन्हा नोंदविण्याची अन्यायकारक कारवाई करू नये तसेच मुदतबाह्य किटकनाशक औषधांची विल्हेवाट परवान्याचे नूतनीकरण कृषी परवाना शुल्क राज्यात एक समान असावेत इत्यादी मागण्यांसाठी कृषी विक्रेत्यांनी पुकारलेल्या 10 ते 12 जुलै दरम्यान राज्यव्यापी बंद मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील कृषी विक्रेते सहभागी होणार आहेत राज्याच्या कृषी विभागाने मान्यता दिलेल्या कंपन्याकडून बियाणे सीलबंद स्थितीमध्ये खरेदी करून सीलबंद स्थितीमध्ये शेतकर्यास विक्री करतात बियाणे उत्पादन करणे किंवा गुणवत्ता प्रमाण प्रमाणीकरण करण्याचे काम विक्रेता करत नाहीत त्यामुळे बोगस बियाणे रासायनिक खते व अन्य निविष्ठा मुळे निर्माण होत असलेल्या तक्रारीसाठी विक्री त्याला जबाबदार धरून त्यांच्यावर अन्याय कारक कारवाई करू नये अशी संघटनेची मागणी आहे*
*विक्रेत्याकडून तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची रक्कम 15 कोटी रुपये कृषी विभागाने तातडीने करावी कृषी विक्रेत्याकडे मुदतबाह्य कीटकनाशक औषधांच्या साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आयुक्तालय स्तरावरून आदेश देण्याची कारवाई करावी तसेच नवीन परवाना देणे परवाना नूतनीकरण बाबत सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यात एकसमान आकारणी करावी इत्यादी मागण्यासाठी तीन दिवसीय बंद पुकारण्यात आले आहे*
*शेती हंगामाचे दिवस असुन याकाळात किट पीकांचे मोंठ्या प्रमाणात नुकसान करतात अश्यात शेकर्यांना पुढील तीन दीवस फवारणी करीता कीटकनाशके व खते याकरिता तातकाळत राहावे लागेल याकरिता शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊण सदर तिढा सोडवावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे*
*सावनेर तालुका ऐग्रो असोसिएशन च्या वतीने तालुका क्रु्षी अधिकारी कु.कोरे व पर्यवेक्षक डहाट यांचे मार्फत कु्षी मंत्री महाराष्ट्र शासन यांना मागणीचे निवेदन सादर केले आहे.*
*याप्रसंगी सावनेर तालुका क्रु्षी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश दाणी,रमेश घटे,बेनीप्रसाद बरैय्या,हिरालाल ढेंगे,दिपक भोंगाडे,अंकुश डवले,किशोर बोकडे,विनय धपके,दिपक वांढरे,हकिम वाघाडे,दिपक कोल्हे,अजय वैध,अमोल पांडे सह तालुक्यातील सर्व क्रुषी केन्द्र संचालक उपस्थित होते*
Maharashtra News Media सच की आवाज