Breaking News

*महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानावर हल्ला केल्याप्रकरणी आरोपीना तात्काळ अटक करा नाही तर दलितांच्या रोषाला सामोर जावं लागेल : -शिलाताई धोटे यांचा राज्य सरकारला इशारा*

*महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानावर हल्ला केल्याप्रकरणी आरोपीना तात्काळ अटक करा नाही तर दलितांच्या रोषाला सामोर जावं लागेल : -शिलाताई धोटे यांचा राज्य सरकारला इशारा*

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे

चंद्रपूर :- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या दादर येथील राजगृह निवास स्थानावर काही अज्ञात लोकांनी काल दि ७ जुलै रोजी हल्ला करून तोडफोड केली आहे . ही घटना अत्यंत संतापजनक व निषेधार्थ असून राज्यसरकारने या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन तोडफोडी प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढावी व आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून प्रचंड उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राज्यसरकार ला रिपब्लिकन पक्षाच्या कोरपना तालुका जिल्हा चंद्रपूर सचिव शिलाताई धोटे यांनी दिला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेले हे राजगृह निवासस्थान आहे.ते ह्या राजगृहात स्वतः राहात होते तसेच त्यांनी आपल्या पुस्तकाची लायब्ररी आणि अनेक महत्वपूर्ण वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. त्यामुळे राजगृह ही वास्तू आंबेडकरी अनुयायासाठी प्रेरणास्थान व श्रद्धास्थान म्हणून अजरामर आहे. ज्याप्रमाणे चैत्यभूमी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आहे त्याप्रमाणेच राजगृह सुद्धा भीमसैनिकासाठी वंदनीय स्मारकच आहे.अशा वंदनीय राजगृहावर कोणी हल्ला करून त्याची तोडफोड करत असेल तर ती ती घटना अत्यंत निंदनीय आहे. एक प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची विटंबना व अवमान करणारी घटना असून आंबेडकरवादी जनता ही बाब कदापी सहन करणार नाही.
असे नीच निंदनीय व संतापजनक कृत्य करणाऱ्या बदमाश आरोपीचा त्वरित शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी शिलाताई धोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कडे करत आहेत
अन्यथा सर्व आंबेडकरी जनता व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात प्रखर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत . रिपब्लिकन पक्षात जरी अनेक गट तट असले तरी आम्ही सर्व रिपब्लिकन नेते बाबासाहेबांच्या निवासस्थान स्मारकासाठी एकत्र येऊन प्रखर लढा उभारू असा इशारा राज्यसरकार ला शिलाताई धोटे यांनी दिला आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …