Breaking News

‌*” शेवगा शेतीचे प्रशिक्षण व रोपांचे वाटप पोलीस स्टेशन पेरमिली येथे संपन्न

‌*” शेवगा शेतीचे प्रशिक्षण व रोपांचे वाटप पोलीस स्टेशन पेरमिली येथे संपन्न “*

विशेष प्रतिनिधि

पेरमिली09/07/2020 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बजरंग देसाई सा यांचें उपस्थित उपपोस्टे पेरमिली येथे शेवगा लागवड प्रात्यक्षिक व 3000 शेवगा रोपांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम मध्ये हद्दतील शेतकऱ्यांना एकत्र करून सोशल डिस्टसचे तंतोतंत पालन करुन निवडक शेतकऱ्यांना एकत्र करून पोलीस स्टेशनच्या शेजारच्या जमिनीवर प्रत्यक्ष डेमो प्लाट वर मा. कांबळे सा. तालुका कृषी अधिकारी, घनवट सा. मंडल कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत शेवगा रोपांचे लागवड करण्यात आली व 3000 शेवगा रोपांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी आलदंडी, कोरेली, पेरमिली गावातील शेतकरी उपस्थित होते.
मा. देसाई साहेबांनी शेवग्याचे आहारातील महत्त्व सांगुन पोलीस विभागाने गेल्या 2 वर्षीत शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या उपक्रमाची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी कांबळे सा. यांनी शेवगा लागवड कशी करावी याचे प्रात्यक्षिक शेतक-यांना दिले. प्रभारी अधिकारी मतकर सा. यांनी शेवगा हे झाड जास्तीत जास्त जीवनसत्त्वे देणारे झाड असुन त्यापासून आर्थिक उत्पन्न मिळावे व त्यांचा आर्थिक फायदा आदिवासी शेतकऱ्यांना देवुन डेमो प्लाट वर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेवगा शेतीचे प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी पेरमिलीचे सरपंच प्रमोद आत्राम, वन विभागाचे अधिकारी पवार सा., जेष्ठ पत्रकार डॉ दुर्ग, पेरमिली गावाचे सचिव मेश्राम सा. उपस्थित होते. सुत्रसंचालन पोउपनि पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पोउपनि सपकाळे यांनी केले.
पेरमिली येथील पोलीस निरीक्षक महेश मतकर प्रदिप गायकवाड यानि पेरमिली येयील शेतकरी व विध्यार्थ्यांना अनेक उपक्रम राबविले त्या मध्ये वाचनालय भाजीपाला लागवड श्री पध्यतीने धान्याची लागवड मच्छी लागवड कसे करायचे या बाबतीत मार्गदर्शन केले व डेमो करून दाखवली या मुळे पोलीस निरीक्षक याची शेतकरी व विध्यार्थ्यांना बद्दल आपुलकी चा भाव अधिकारी वर्गामधे मधे दिसून आला

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …