*वीज कंत्राटी कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
*नागपुर:- संघटनेने महाराष्ट्रातील महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपनीत गेले अनेक वर्ष सातत्याने नियमितपणे व गरजेनुसार काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे विविध प्रश्नन व प्रलंबित मागण्यासाठी दिनांक 07 जुलै 20 पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध लोकप्रतिनिधीनी मध्यस्थी केल्यामुळे दिनांक 08 जुलै 2020 रोजी मंत्रालय मुंबई येथे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या समवेत संघटना प्रतिनिधी ची बैठक झाली. या बैठकीदरम्यान भरती प्रक्रियेचे निकष चुकीचे असल्याचे संघटनेने निर्दशनास आणून दिले या भरती बाबत पूर्णविचार करावा. कोवीड – 19 काळात मृत्यूपावलेल्या व अपघातग्रस्त कामगारांना आर्थिक मदत मिळावी तसेच भरती झाल्यास कोविड काळात हजारो कंत्राटी कामगार बेरोजगार होऊन त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून उपाययोजना करावी, कंत्राटी कामगारांना शाश्वत व कंत्राटदार विरहित रोजगार देण्यात यावा यासाठी उपाय योजनेचे पत्र संघटनेच्यावतीने मंत्रिमहोदयांना देण्यात आलेले होते या सर्व विषयावर तीन विज कंपनीतील वरिष्ठ पातळीवर लवकरच माझ्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावून यामध्ये या प्रश्नावर सकारात्मक रित्या तोडगा काढायला पाहिजे असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री यांनी दिले संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात सरचिटणीस सचिन मेंगाळ यांना दिले मंत्रीमहोदयांच्या आवाहनानुसार आज दिनांक 09 जुलै 2020 पासून सदर काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज