Breaking News

*धानला येथे कोरोना सर्वेक्षण संदर्भात सभेचे आयोजन* *सर्वेक्षण कर्त्यांना दिल्या सुचना*

*धानला येथे कोरोना सर्वेक्षण संदर्भात सभेचे आयोजन*

 

*सर्वेक्षण कर्त्यांना दिल्या सुचना*

 

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या पर्शवभूमीवर गावखेड्याच्या होत असलेल्या निरंतर सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सभा दि.१० जुलै रोजी तालुक्यातील धानला येथील ग्रामपंचायत सभागृहात पार पडली.

या सभेला मौदा तहसीलदार प्रशांत सांगळे, खंडविकास अधिकारी दयाराम राठोड, धानला ग्रामपंचायत सरपंच वनिता वैद्य यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मौदा पंचायत समिती सभापती दुर्गाताई ठवकर, पं.स. सदस्या वंदना सिंगनजुडे, धानला ग्रामपंचायत उपसरपंच अजय हारोडे, ग्रा.पं. सदस्य रमेश चव्हान, गुणवंत पत्रे, माजी पं.स. उपसभापती राजेश ठवकर उपस्थित होते. गावातील प्रत्येक कुटुंबाचे काळजीपूर्वक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पर्वेक्षक कडे सादर करावा. व सर्वेक्षकाने कुटुंब प्रमुख तसेच खाजगी डॉक्टर यांच्या संपर्कात राहून कुटुंबातील सदस्यांना सर्दी, खोकला व ताप असल्यास आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना माहिती द्यावी. तसेच सर्वेक्षण करताना सोशल डिस्टन्स, मास्क व सँनिटायझर याचा वापर करावा. अशा सूचना तहसीलदार प्रशांत सांगळे व खंडविकास अधिकारी दयाराम राठोड यांनी सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचऱ्याना दिल्या.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …