Breaking News

*वरोरा शहरा लागतच बोर्डा गावात कोरोनाचा शिरकाव एकाच कुटुंबातील तिघे पॉझिटीव्ह*

*वरोरा शहरा लागतच बोर्डा गावात कोरोनाचा शिरकाव एकाच कुटुंबातील तिघे पॉझिटीव्ह*

 

वरोरा प्रतिनिधी-  मूजम्मील शेख

वरोरा-  शहरालगत असलेल्या बोर्डा गावातील एक कुटुंब चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे लग्न सोहळ्यासाठी गेले होते.त्या लग्न सोहळ्यातील काही लोक कोरोना पॉझिटीव्ह निघाल्यानंतर सर्वांना संस्थात्मक अलगिकरणात ठेवण्याचे प्रशासनाने आदेश दिले.बोर्डा गावातील  संबंधित कुटुंबाला 8 जुलै ला वरोरा शहरातील कोविड-19 अलगिकरन कक्षात दाखल करण्यात आले.त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.यामध्ये एकाच कुटुंबातील पती वय ,55 वर्ष,पत्नी 48 वर्ष,मुलगा 25 वर्ष या तिघांचाही 10 जुलै ला कोरोना पॉझिटीव्ह चा रिपोर्ट आला.

बोर्डा परिसराचा विस्तार मोठा असून,कोरोना पसरू नये यासाठी प्रशासन अलर्ट झाले आहे.पॉझिटीव्ह रुग्णांच्या राहत्या घराच्या परिसराला गटविकास अधिकारी,ग्रामसेवक,सरपंच यांनी भेट देऊन पुढील उपाययोजना करीत आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …