*राज्य सरकारने तीनशे युनिट कमी करुन जनतेला दिलासा द्यावा – आ.सावरकर*

*विज बिल जाळून केला आघाडी सरकारचा निषेध*
*भाजप कार्यालय समोरील प्रकार*
उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : जागतिक स्तरावर झालेल्या कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेकांना हातचे काम सोडून घरातच रहावे लागले. याचाच एक भाग म्हणून आर्थिक चणचण भासू लागली. त्यातच विज वितरण कंपनीचे भरमसाठ वाढून आलेल्या बीलामुळे सामान्य नागरिकांचे कंरडे मोडले आहे. याबाबतीत आघाडी सरकारने तीनशे युनिट माफ करुन सुधारित विज बिल पाठवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार टेकचंद सावरकर यांनी निषेध आंदोलन दरम्यान केली आहे.
वाढिव बिलाच्या विरोधात कामठी-मौदा विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या नेतृत्वाखाली दि.१० जुलै रोजी मौदा येथिल भाजपा कार्यालया समोर विज बील जाळून घोषणा देत भाजपा मौदा शहराच्या वतीने आघाडी सरकारचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. “विज बिल माफी आंदोलन” करून विज बिलाची “सांकेतिक होळी” करण्यात आली. राज्य सरकार व सरकार मधील ऊर्जा मंत्र्याच्या निषेधार्थ नारे लावण्यात आले.
या आंदोलनात सहभागी आमदार टेकचंद सावरकर, मौदा नगरपंचायतीचे नगराध्यक्षा भारती राजु सोमनाथे, उपाध्यक्षा शालिनी कुहीकर, शहराध्यक्ष प्रकाश येळणे, नगरसेवक मुन्ना चलसानी, राजु सोमनाथे, देविदास कुंभलकर, नगरसेविका विमल पोटभरे, सुषमा कुंभलकर, वैशाली चौहान, सुनीता पाराशर, शरद भोयर, रमेश कुंभलकर, देवेन्द्र सांगडीकर, राजकुमार देशमुख, सौरभ खरवडे, अंशुल कुंभलकर देवराव करडभाजने, शुभम सहारे, चतुर येळणे कैलास वैद्य, योगेश अंबागडे, मोरेश्वर राजगिरे, गुंडेराव पत्रे, राजेश ठोंबरे, राहूल हटवार, योगिता ढबाले, सोमनाथे, बावने व शेकडो नागरिक व कार्यकर्ते उपस्तित होते.
Maharashtra News Media सच की आवाज