Breaking News

*आमदार डॉ परिणय फुके यांनी जिल्हाधिकारी, गोंदिया यांना विविध विषयांबाबत निवेदन*

*आमदार डॉ परिणय फुके यांनी जिल्हाधिकारी, गोंदिया यांना विविध विषयांबाबत निवेदन*

*विशेष प्रतिनिधी गोंदिया*

गोंदियाआमदार डॉ परिणय फुके यांनी बैठकीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, घरगुती व कृषी विज बिल सरसकट माफ करण्याबाबत, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजने बाबत, आधारभूत धान खरेदी बाबत, पीक कर्ज वाटप करणे बाबत, रेती माफिया वर कार्यवाही बाबत, पीएम किसान सन्मान योजनेबाबत, स्वस्त धान्य योग्य वाटप बाबत, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उपरोक्त विषयांबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या.

तसेच घरकुल योजने अंतर्गत घरकुल बांधकाम करण्याकरिता रेती उपलब्ध होत नसल्यामुळे रेतीची काळा बाजार रेती खूप महागात विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे घरकुल योजनेचे काम बंद पडलेले आहे. तरी त्यावर त्वरित तोडगा काढून कमी दरात रेती उपलब्ध करून देण्यात यावी अशा सूचना डॉ परिणय फुके यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष केशव मानकर, आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार संजय पुराम, विरेन्द्र अंजनकर, अल्ताफ हामिद, विश्वजीत डोंगरे, संतोष तिवारी, नरेंद्र तुरकर, , जिल्हा परिषद सदस्य, नगर पंचायत सदस्य उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …