Breaking News

*देशी दारूचे दुकान जाळणारे अज्ञात आरोपी मोकाटच -पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष* *तपास सुरू असल्याची बतावणी* *तक्रार कर्त्याची न्यायाची मागणी*

*देशी दारूचे दुकान जाळणारे अज्ञात आरोपी मोकाटच -पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष*

*तपास सुरू असल्याची बतावणी*

*तक्रार कर्त्याची न्यायाची मागणी*

नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

नरखेड–  पोलीस ठाण्यांअंतर्गत मोवाड या गावात गणेशपुर रोड लगत आशा रामकीशोर जैस्वाल यांचे स्वमालकीचे शासकिय देशी दारूचे दुकान काही अज्ञात चोरट्यांनी आग लावुन खाक केले
होते. त्यात त्यांचे एकुण १ लक्ष ६३ हजार रूपयाचे नुकसान झाले असुन सदर घटना २६ जुनच्या मध्यरात्री घडली. दुकानमालकाने यासंदर्भातील रितसर तक्रार २७ जुनला नरखेडपोलीस ठाण्यात दीली होती. दीड आठवडा उलटुनही देशी दारूच्या दुकानाला आग लावून जाळणारे अज्ञात आरोपी मात्र नरखेड पोलीसांच्या दुर्लक्षाने मोकाटच फीरत असल्याच्या चर्चेला आता चांगलेच उधान आले
आहे.

नरखेड पोलीसांनी अज्ञात आरोपी विरूध्द भादवी च्या कलम ४३६ अन्वये गुन्हा नोंद करून पोलीस ऊपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे याप्रकरणी पुढील तपास करीत असल्याचे भ्रमणध्वनीवरून ठाणेदार मल्लिकार्जुन ईंगळे यांनी सांगीतले खरे ! पण दुकान जाळणार्‍या अज्ञात चोरट्या विषयी नरखेड पोलीस गंभीर दीसत नसल्याने पोलीस यंत्रणा मात्र तक्रारकर्त्याच्या तोंडाला पाने पुसत असल्याची सर्वत्र ओरड आहे हे विशेष. दुकान मालक आशाबाई जैस्वाल यांचा तक्रारकर्ता मुलगा शैलेश जैस्वाल यांचे तक्रारीवरून सहा वर्षे दुकान बंद अवस्थेत असतांनी अनेक संकटातुन निघत तसेच कोरोना लाॅकडाऊन सुरू असतांनी आजपर्यंत न घडलेला असा घृणास्पद प्रकार घडला असुन मोठा आर्थीक भुर्दंड सहन करावा लागला आहे. तरी पोलीस प्रशासनाने या बाबीचा छडा लावून आरोपींना जेरबंद करावे अशी मागणी तक्रारकर्त्यांकडुन करण्यात येत आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …