Breaking News

*इयत्ता नववी आणि दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके द्या – वांगे*

*इयत्ता नववी आणि दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके द्या – वांगे*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सध्या इयत्ता पहिली ते आठवी पर्येंत शासकीय मान्यता प्राप्त शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. परंतु नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना वगळण्यात येते.

आज देशात कोरोना मुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहे. ग्रामीण भागात अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे आज ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. ग्रामीण भागातील शाळा बंद आहे. त्यामुळे अनेक विदयार्थी घरीच अभ्यास करीत आहेत. शिक्षण विभागाकडून इयत्ता पहिली ते आठवी पर्येंत पाठ्येपुस्तके वाटप करण्यात आली आहे. परंतु आर्थिक परिस्थिती मुळे ज्यांचे पाल्य नववी आणि दहावी इयेत्तेत शिकत आहेत. ते आपल्या पाल्यांना महागडी पुस्तके घेऊन देऊ शकत नाही. त्यामुळे ज्या प्रमाणे पहिली ते आठवी पर्येंत शालेय विद्य्रथ्यांनया मोफत पुस्तके दिली जाते, त्याच प्रमाणे इयत्ता नववी आणि दहावी च्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्येपुस्तके देण्यात यावी. अशी मागणी मौदा शिवसेनेचे युवा नेते नितेश वांगे यांनी महाराष्ट्र न्युज मीडीयाशी बोलतांना केली आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …