*राजग्रूहावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कोरपना पोलीस ठाणेदारांना निवेदन *
*आरोपीना तत्काळ अटक दोन्ही ना करण्याची आर. पी. आयची मागणी*
कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना . —विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर दि . ७ जुलै २०२0
ला अज्ञातांकडून तोडफोड केले बद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले (कोरपना अध्यक्ष प्रभाकर खाडे यांच्या नेतृत्वात कोरपना येथील तहसीलदार / तथा दंडधिकारी साहेब कोरपना तालुकाआणी पोलीस ठाणेदार कोरपना यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन आज दिनांक ११/७/२0२0 ला आंदोलना दरम्यान देण्यात आले आहे.
सविनय विनंती याद्वारे .यावेळी सदरील निवेदनात म्हटले आहे की , मुंबई येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘ राजगृहा’वर दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील मौल्यवान वास्तुसह कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सदर राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. अख्या जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे.
आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण असून राजगृहावरील तोडफोडीने देशातील आंबेडकरी चळवळीवर प्रेम करणाऱ्या जनतेच्या भावना दुखावल्या आहेत .सदरील घटना ही आंबेडकरी चळवळीतील बहुजन समाजाच्या भावना दुखावनारी व अशोभनिय आहे .
तसेच राजगृहावर झालेली तोडफोड ही केवळ राजगृहाची तोडफोड नव्हे तर समग्र आंबेडकरी चळवळीची तोडफोड असून या निंदनीय घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) च्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचे सदरील निवेदनात रिपाइंचे युवा अध्यक्ष प्रभाकर खाडे यांनी या निवेदनात म्हटले आहे .करीता साहेब याद्वारे आमच्या भावना लक्षात घेऊन या मनुवादी या हल्ले खोराना कठोळ साशन करण्यात यावे या निवेना याद्वारे तालूका रिपाईच्या वतीने देण्यात आले आहे
या वेळी रिपाई चे अध्यक्ष प्रभाकर खाडे. रिपाई चे सरचिटणीस गौतम धोटे . रिपाई उपाध्यक्ष गौतम भसारकर. मेघराज हरबडे. दर्शन बदरे . रमेशजी खाडे. नारायण कुळमेथे . अमोल वानखेडे . निखिल ढवळे . काशिनाथ जिवने .प्रज्ञाशिल खाडे. संदिप खाडे आदी सह कोरपना तालुक्यातील रिपब्लिकन चे सह कार्यकर्ते या वेळी निवेदन देण्यात आले आहे.