*शिक्षकांनी पालक आणि विदयार्थी यांचे समपर्कात रहावे – -राठोड*
उपजिल्हा प्रतिनिधी-तुकाराम लुटे
मौदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊन घोषित असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद आहेत. शिक्षण विभागाकडून इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत पाठ्येपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली आहे. अनेक विद्यार्थी घरी अभ्यास करीत आहे. त्यामुळे त्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी त्यांच्या अभ्यासविषयी निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होण्याच्या दृष्टीने शाळेतील शिक्षकांनी विदयार्थी व पालक यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किंवा भ्रमणध्वनी च्या माध्यमातून समपर्कात रहावे असे आवाहन मौदा पंचायत समिती खंडविकास अधिकारी दयाराम राठोड यांनी केले आहे.
सध्या लॉक डाऊन मुळे ग्रामीण भागातील शाळा बंद आहे. अनेक शिक्षक ऑनलाइन शिक्षणाच्या पद्धतीने अध्यापन करीत आहे. पण ग्रामीण भागातील अनेक पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत. त्यामूळे अशा पालकांच्या पाल्यांची अडचण निर्माण झाली आहे. अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. परंतु हे करत असताना सोशल डिस्टंन्सिंग चे सर्व नियम काटेकोर पणे पालन करावे असेही खंडविकास अधिकारी दयाराम राठोड यांनी महाराष्ट्र न्युज मीडीयाशी बोलताना सांगितले.
Maharashtra News Media सच की आवाज