*मनसर बोर्डामध्ये 22 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह*
रामटेक प्रतिनिधि- ललित कनोजे
रामटेक–नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग मनसर पासून ५ km किमी अंतरावर असलेल्या सरखा बोर्डा ग्रामपंचायतीमधील रहिवासी महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे. मनसर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अंतवार यांना मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्र, मनसर येथे या महिलेने मुलाला जन्म दिला होता. जन्म दरम्यान वजन कमी झाल्यामुळे 5 जुलै रोजी बाळाला नागपुरात रेफर केले होते. या महिलेची नागपुरात चाचणी घेण्यात आली. त्यानंतर काल 11 जुलै रोजी महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळली.
प्रशासनाला याची माहिती मिळताच तहसील व आरोग्य विभागाचे पथक महिलेच्या निवासस्थानी पोहचत आहे व आवश्यक कारवाई करीत आहे.