Breaking News

*अल्ट्राटेक सिमेंट आवरपुर कंपनी तील बी एस आर ठेकेदारी कामगारांना काम न दिल्यास ,१५ दिवसा चा पगार देण्याचा करार.*  *हा एकमेव पहिला च अनोखा करार*

*अल्ट्राटेक सिमेंट आवरपुर कंपनी तील बी एस आर ठेकेदारी कामगारांना काम न दिल्यास ,१५ दिवसा चा पगार देण्याचा करार.*


 *हा एकमेव पहिला च अनोखा करार*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

कोरपना :- चंद्रपूर कोरपना आदिवासी बहूल तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट अवारपुर ही कंपनी कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे २४ मार्च पासून पूर्ण ता बंद होती.
शासकीय परवानगीनंतर कंपनीचे काम एक महिन्यानंतर टप्या टप्यानी सुरू होऊन १ जूनपासून कंपनी नियमित सुरू झाली.

व ३१ मे पर्यंतचा लॉक डाऊन चा पगारा बद्दल युनियनने मध्यस्थी करून सन २०१९ च्या एप्रिल व मे महिन्याच्या पगाराचा अव्हरेज काडून सर्वच ठेकिदारी कामगारांना एप्रिल व मे २०२० महिन्याच्या पगार देण्यात आला.

जून महिन्यात कंपनीचे काम सुरुझाले, परंतु कामा वरील बी एस आर ठेकेदारी कामगारांना सुरळीत काम न मिळाल्यामुळे व कंपनीने प्रत्येक्ष हाजरीचाच पगार दिल्यामुळे बऱ्याच कामगारांना २-४ दिवसांच्या अल्प पगारात जिवन जगण्याची असह्य परिस्तिथी निर्माण झाली होती.

ह्याच अडचणींला प्रथम प्राधान्य देऊन अल्ट्राटेक सिमेंट
आवरपुरच्या व्यवस्थपण सोबत,
येथील कार्यरत अल्ट्राटेक सिमेंट कामगार संघाने दोन वेळ प्रदीर्घ
चर्चा करून युनियन चे अध्यक्ष मा.माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व मध्यस्तीने असा करार करण्यात आला की,
💥*बि एस आर ठेकेदारी कामगारांना पूर्ववत काम द्यावे अन्यथा काम न दिल्यास कमीत कमी १५ दिवसांचा पगार द्यावा व जून महिन्याचा झालेला पगार सुद्धा कमीत कमी १५ दिवसाचा द्यावा व जो पर्यंत
परिस्तिथी सुरळीत होणार नाही तो पर्यंत हा निर्णय लागू राहील* 💥असा करार आता पर्यंत भारतभरातील अल्ट्राटेकचा‌ कोणत्याही सिमेंट कंपनीत झाला नाही.

बि एस आर ठेकेदारी कामगारांना जास्तीत जास्त हाजिरी मिळन्या करिता सप्लाय कामगारातील रिटायरमेंट वा रिक्त झालेल्या जागेवर बि एस आर कामगारांना सामावून घेण्याबद्दल दीर्घ चर्चा करून पुढे मार्ग काढ न्याचे मंजूर झाले आहे.

वरील चर्चेत कंपनी कडून युनिट हेड श्री विजय एकरे ,अनिल पिल्लई, पाठक तसेच कामगार संघा कडून कर्याध्यक्ष श्री शिवचंद्र काळे, नंदकिशोर बिलारिया , एम एस चंदेल, नरेंद्र पांडे , गजानन बोढेकर, शामसुंदर रेड्डी व भिवगळे यांनी कामगार हिताचा उत्कृष्ट करार दिनांक ०९/०७/२०२० शुक्रवार ला करण्यात आला कराराची माहिती सर्वांना देण्यात आली तेव्हा बहुसंख्य कामगारांनी आनंद वक्त करून व्यवस्थापन चे व नरेशबाबु पुगलिया यांचे आभार मानले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …