*वर्धा हनुमान नगर येथे गर्भवती महिला कोरोना बाधित*
वर्धा प्रतिनिधी विश्वास बांगरे
वर्धा- सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या २७ वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. सूत्रांनी त्या महिलेच्या गर्भवती असल्याची माहिती दिली. ही महिला वार्धेला हनुमान नगर येथे माहेरी आली होती.
अकोला येथील रहिवासी महिला काही दिवसांसाठी माहेरी आली होती. उपचारादरम्यान कोरोनाची लक्षणे दिसल्यामुळे तिचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी पोसिटीव्ह आला.प्रशासनाने हनुमान नगर येथे पुढील उपाययोजना चालू केल्या आहे.