Breaking News

*दुर्गम भागातील रस्ते व पुलांसाठी ५० कोटींची तरतूद करा:पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

*दुर्गम भागातील रस्ते व पुलांसाठी ५० कोटींची तरतूद करा:पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

गड़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुड़कर

गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. अशा दुर्गम गावांना पक्के रस्ते व पुलांनी जोडण्यासाठी दरवर्षी ५० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी इतर मागास, बहूजन विकास, मदत व पुनर्वसन, तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली.

विजय वडेट्टीवार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीडिओ कॉन्फरंसिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. मागील आठवडयात भामरागड तालुक्यातील एका गरोदर महिलेला २३ किलोमीटर पायी चालत दवाखान्यात जावे लागले, तर दुसऱ्या महिलेचा दवाखान्यात जाताना मृत्यू झाला. या घटना अतिशय दुर्दैवी आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दरवर्षी ५० कोटी रुपये दुर्गम भागात रस्ते व पूल बांधण्यासाठी देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर सादरीकरण केल्यास आपण निधी देऊ, असे सांगितले.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. प्रशासन योग्य काळजी घेत असून, नागरिकांनी संसर्गाबाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले. बाहेरील जिल्हयात ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रवासासाठी कोणतेही एक ओळखपत्र व जमिनीचा सातबारा आवश्यक आहे. त्यांना वेगळया पासची गरज नाही, असे ते म्हणाले. जिल्हा क्रीडांगणाला २७ कोटी रूपयांची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. शिवाय जिल्हा ग्रंथालयाच्या मागे उपलब्ध असलेल्या जागेत अद्यावत अभ्यासिका लवकरच सुरु होत आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

गोंडवाना विद्यापीठाकडे शिल्लक ७० कोटी रुपये नवीन सुविधा निर्मितीसाठी खर्च करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. सद्या ३५ एकर जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. या परिस्थितीत शिल्लक निधी खर्च करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …