*राजग्रूहावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कोरपना तहसीलदार यांना आज निवेदन*
*आरोपीना तत्काळ अटक करण्याची मागणी -समाज क्रांती आघडी (मुकुंद खैरे) यांच्या वतीने*
कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना – भारतीय घटनेचे महानायक . –विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर दि . ७ जुलै २०२0 ला
अज्ञातांकडून तोडफोड केली त्याबद्दल समाज क्रांती आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सागर बोरकर यांच्या नेतृत्वात कोरपना येथील तहसीलदार / तथा दंडधिकारी साहेब कोरपना यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन आज दिनांक १३ /७/२0२0 सोमवार ला दरम्यान देण्यात आले आहे.
सविनय विनंती याद्वारे .यावेळी सदरील निवेदनात म्हटले आहे की , मुंबई येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘ राजगृहा’वर दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील मौल्यवान वास्तुसह कुंड्यांचे मोठे नुकसान झाली आहे.
सदर राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. अख्या जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे.
आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण असून राजगृहावरील तोडफोडीने देशातील आंबेडकरी चळवळीवर प्रेम करणाऱ्या जनतेच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या आहेत .सदरील घटना ही आंबेडकरी चळवळीतील बहुजन समाजाच्या भावना दुखावनारी व अशोभनिय आहे .
तसेच राजगृहावर झालेली तोडफोड ही केवळ राजगृहाची तोडफोड नव्हे तर समग्र आंबेडकरी चळवळीची तोडफोड असून या निंदनीय घटनेचा समाज क्रांती आघाडी ) च्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचे सदरील निवेदनात आघाडी चे युवा अध्यक्ष सागर बोरकर यांनी या निवेदनात म्हटले आहे .करीता साहेब याद्वारे आमच्या भावना लक्षात घेऊन या मनुवादी या हल्ले खोराना कठोळ साशन करण्यात यावे या निवेना याद्वारे कोरपना तालूका आघडीच्या वतीने देण्यात आले आहे .
या वेळी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सागर बोरकर . मारोतराव लोखंडे .रविकुमार वाघमारे. प्रा.भानुदास पाटील . समिर शेळके . मेघराज हरबडे. आदी सह कोरपना तालुक्यातील समाज क्रांती आघडी चे सह कार्यकर्ते या वेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .