*पाँवर फ्रंन्ट युनियनच्या पदाधिका-यांनी घेतली उर्जामंत्र्यांची भेट*

*नागपूर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
*खापरखेडा:- रविवार दिनांक 12.07. 2020 ला सकाळी दहा वाजता बिजली घर नागपूर येथे वेळात वेळ घेऊन ऊर्जामंत्री सोबत पाँवर फ्रंट युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. महानिर्मिती कंपनीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना 20 टक्के पूरक भत्ता अजून पर्यंत स्थानिक*
*कंत्राटदाराने अजून पर्यंत दिलेला नसून स्थानिक कंत्राटी कामगारांचे स्थानिक कंत्राटदार शोषण करीत आहे. त्याचप्रमाणे माहे 1 जानेवारी 2020 पासून डि.ए विशेष भत्ता 13 रूपये वाढ झालेली अाहे. कर्मचाऱ्यांना अजुन पर्यत काही कंत्राटदाराने 13 रुपये अजून पर्यंत कंत्राटी कामगारांना दिलेले नाही. एकूण दोन हजार पाचशे कंत्राटी कामगार 210 X 4 मेगावँट व 500 X 1 मेगावँट खापरखेडा येथे विविध पदावर कंत्राटी कामगार कार्यरत आहे. महानिर्मीती, महापारेषण, महावितरण या तिनेही कंम्पण्यात सर्वात प्रथम जाँब सेक्युरिटी देण्यात यावी जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर*
*उपासमारीचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच 210 X 4 मेगावँट व 500 X 1 मेगावँट खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात अहोरात्र मेहनत करणारे कंत्राटी कामगार सेवा देत असताना त्यांचा अकाली मृत्यू झालेला असून त्या मृतक कंत्राटी कामगारांच्या पत्नीला किंवा मुलाला कामावर घेण्यात यावे जेणेकरून त्या गोरगरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये.*
*अशा अनेक मुद्द्यावर सविस्तर चर्चा महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी पाँवर फ्रंट युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्याच प्रमाणे मंत्रीमहोदयांनी तात्काळ कोरोना संपताच पाँवर फ्रंट युनियनचे मनने ऐकून मीटिंग लावण्याचे आश्वासन दिले पाँवर फ्रंट युनियनचे खापरखेडा अध्यक्ष भूपेंद्र चतुर्वेदी यांनी प्रसारमाध्यमांना बोलतानी माहिती दिली.*
Maharashtra News Media सच की आवाज