Breaking News

*सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा यांचेवर कारवाई करा*

*सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा यांचेवर कारवाई करा*

*पोलीस वाहनातील ध्वनिक्षेणावरुण अश्लिल भाषेत सूचना*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोराकोविड -19 संचार बंदी काळात येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा हे पोलिस वाहनाच्या ध्वनिक्षेपणातून अश्‍लील शब्दात नागरिकांना सूचना करतात. तसेच मारहाण करने, घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांना लाथ मारून पाडणे, घरात घुसून मारणे असा प्रकार करीत असल्याने त्यांच्या दहशती खाली भद्रावतीकर आहे. त्यांच्या असल्या कृत्याच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. संचारबंदी काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनातर्फे केले आहे. नागरिक अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर निघाले असता त्यांना विचारना न करताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा हे मारहाण करीत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. तसेच ते आपल्या पोलिस वाहनाद्वारे गस्तीवर असताना घरासमोर उभ्या असलेल्या नागरिकांना अश्लील शब्दात सूचना देतात.

यावेळी कुटुंबातील महिला तरुण मुली असल्याचा देखील विचार करीत नाही. खुर्च्यांची तोडफोड करणे, दुचाकी वाहने लाथेने पाडणे, वाहनांची तोडफोड करणे, चालत्या दुचाकीस्वारावर दंडुका भीरकाविणे, हिरव्या तिखट मिरच्या खाऊ घालने या प्रकारचे अघोरी कृत्य करतात. त्यांच्या या वागणुकीची नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. वर्मा यांच्या अशा वागणुकीवर आळा घालावा व त्यांच्या अशा कृत्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड राजू गैंनवार यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना तहसीलदार यांचे मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …