Breaking News

*राजग्रूहाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी* *समाज क्रांती आघाडीच्या वतीने करण्यात आली राजूरा येथील तहसीलदार यांना निवेदन*

*राजग्रूहाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी*


*समाज क्रांती आघाडीच्या वतीने करण्यात आली राजूरा येथील तहसीलदार यांना निवेदन*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

कोरपना :- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजग्रूहाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी राजूरा येथील शाखा समाज क्रांती आघाडीच्या वतीने आज तारीख १४/७/२०२०ला मंगळवार.निवेदन दरम्यान करण्यात आली आहे. सदर निवेदन राजूरा येथील पंचायतसमितीच्या समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकूती पुतळ्याला पुष्पहार अर्पण वंदना करून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.सदरचे निवेदन राजूरा तहसीलदार यांच्या माफँत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले आहे.दादर येथील समस्त आंबेडकरी अनुयायांची आस्था असणारे राजगृह वर काही समाजकंटकांनी जाणून-बुजून हल्ला केला आहे. सर्वप्रथम आम्ही या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो. राजगृह हे केवळ घर नाही तर ते समस्त आंबेडकरी जनतेचे प्रेरणास्थान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याठिकाणी आपल्या जीवनाची कमाई अर्थात पुस्तके ठेवली आहेत केवळ पुस्तकाला घर बांधने ही गोष्ट फक्त भारताच्या इतिहासात नाही तर जगाच्या इतिहासात अजरामर आहे.

इतिहास काही समाजकंटक पुसू पाहत आहेत परंतु हे त्यांच षडयंत्र आम्ही सफल होऊ देणार नाहीत तेव्हा आपल्याला विनंती करण्यात येते की, या बाबतीत लवकरात लवकर हल्लेखोरांना अटक करून कारवाई करावी अन्यथा संपूर्ण देशभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या आशेने .तहसीलदार राजूरा येथे समाज क्रांती आघाडी शाखा राजूरा यांच्या वतिने निवेदन देण्यात आले .या वेळी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सागर बोरकर . तर तालुका अध्यक्ष रूषिभाऊ वाघमारे. गणपत पुणेकर . मारोतराव लोखंडे . प्रा. भाणुदास पाटील. समीर शेळके. सुभाष नगराळे. आणी गौतम धोटे आदी ची यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …