*पावसात नाल्या तुडंब असल्याने रस्ते जलमग्न*
*स्वच्छ भारत समु्ध्द भारत योजनेला प्रशासनाचा खो…*
वरोरा प्रतिनिधि -जुबेर शेख
*वरोरा– वरोरा नगरपालिकेच्या मानसुन पुर्व नियोजनाच्या आभावामुळे शहरातील कर्मवीर वॉर्ड येथील नाल्या पहिल्याच पावसात तुडुंब भरून रस्त्यावर वाहत असुन संपूर्ण नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे*
*एकीकडे कोवीड़ 19 च्या लाँकडाऊन व इतर शासकीय उपाययोजना मुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे रहिवासी नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊन त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो .नाल्यांची उचीत साफसफाई होत नसल्याने पाणी तिथेच जमा होऊन तुडुंब असे खड्डे साचते , कर्मवीर वॉर्ड मध्ये पावसाळ्यात नेहमीच हीच परिस्थिती असते असे बोल्याजात असुन याकडे नगर परिषदेने लक्ष देणे गरजेचे आहे परंतु असे होताना दिसत नाही*

*केन्द्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत समु्ध्द भारत या योजने अतंर्गत नगर परिषद वरोरा व्दारे सफाई साठी अनेक कार्यक्रम केले आहे परन्तु ते “पुढे पाठ मागे सफाट असे दिसत आहे*
*स्वच्छतेचा कीतीही गाजावाजा केला तरी मात्र जमीनीस्तरावर कार्य दिसून पडत नाही सोबतच मानसुन पुर्व शहरातील सांडपाणी वाहून नेणार्या नाल्यांची योग्य साफसफाई होणे गरजेचे असुन सूध्दाही आजच्या स्थीतीत थोड्याशा पावरात नाल्या तुडुंब भरुन रस्त्यावर वाहू लागतात तसेच पावूस गेल्यावर नाल्यातील संपूर्ण घाण रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला तशीच साचलेल्या मुळे एकीकडे दुर्गंधी सोबतच नाल्यातील घाण,विषारी जीवजंतू मुळे कर्मवीर वार्डातील नागरिकांचे जीव विठीस आले आहे*

*नगर प्रशासनाने तातडीने उपाययोजना आखून गार.व घाणीने भरलेल्या नाल्यांची सफाई करुण नागरिकांचे आरोग्य जपावे अशी मागणी नागरिकांतुन होत आहे*
Maharashtra News Media सच की आवाज