*गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले गुजर परिवाराचे सांत्वन*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : नागपूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांचे वडील राजे विजय कुमार गुजर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानिमित्त आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिल बाबू देशमुख यांनी मौदा येथील गुजरवड्यातील निवास स्थानी जाऊन गुजर परिवाराचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषद आ. प्रकाश गजभिये, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाबुराव तिडके, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आशिष पाटील, काँग्रेस नेते अशोक वासनिक, राजेंद्र जयस्वाल, माजी नगरसेवक पृथ्वीराज गुजर, सामाजिक कार्येकर्ते रामप्रसाद पराते, मौदा तहसीलदार प्रशांत सांगळे उपस्थित होते.

यावेळी मौदा तालुक्यात कोरोनाच्या बाबतीत केलेल्या उपाय योजनांची माहिती तहसीलदार प्रशांत सांगळे यांचेकडून जाणून घेतली.
Maharashtra News Media सच की आवाज