Breaking News

*समर्थची सांची रूस्तम रामटेके तालुक्यातून प्रथम* ** ९ कनिष्ठ महाविद्यालये “शंभर नंबरी ” ** ** तालुक्याचा सर्वंकष निकाल ९१.६५ टक्के **

*समर्थची सांची रूस्तम रामटेके तालुक्यातून प्रथम*

** ९ कनिष्ठ महाविद्यालये “शंभर नंबरी ” **


** तालुक्याचा सर्वंकष निकाल ९१.६५ टक्के **

रामटेक तालूका प्रतिनिधी ललित कनोजे

रामटेकराज्य माध्य.व उच्च माध्य.परिक्षा मंडळाकडून आज जाहिर झालेल्या १२ वी च्या निकालावर “कोरोना इफेक्ट “दिसून आला असून तालुक्यातील तब्बल ९ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल “शंभर नंबरी”लागला आहे.त्यात शहरातील दोन तर ग्रामिणमधील सात कनिष्ठ महाविद्यालये आहेत.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांची रूस्तम रामटेके हिने ९१ टक्के गुणांसह तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला तर याच महाविद्यालयाच्या गुंजन राजू सरोदे याने ९० टक्के गुणांसह द्वितीय,प्रणाली अनिल चकोले हिने ८९ टक्के गुणांसह तृृृतिय,कार्तिक संजय पडोळे व मेघांत भिवाजी खोडे यांनी ८८.६१ टक्के गुणांसह संयुक्तपणे चौथे स्थान पटकावले.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाद्वारे आज १२ वी विज्ञान, वाणिज्य ,कला व १२ वी व्होकेशनल परिक्षांचा आॅनलाईन निकाल जाहिर करण्यात आला. तालुक्यातून एकूण २०७४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली त्यापैकी ४८ प्राविण्य श्रेणीत, ५२० प्रथम श्रेणी ,११८४ द्वितीय श्रैणी तर १४९ तृृतिय श्रेणीत उत्तीर्ण झालीत.तालुक्याचा सर्वंकष निकाल ९१.६५ टक्के आहे. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के,कला शाखेचा ८९ टक्के तर १२ वी व्होकेशनलचा निकाल ९२.४२ टक्के लागला आहे.कला शाखेतून मोनाली गौतम खोब्रागडे ८० टक्के गुणांसह प्रथम,आदिल अब्दुल कादिर कुरेशी ७६ टक्के गुणांसह द्वितीय तर अभिषेक उमाकांत घरजाळे ७३ टक्के गुणांसह तृतिय आला.

१२ वी व्होकेशनल मधून क्राॅप सायंस शाखेचे प्रथम दोन विद्यार्थी असे -१) पायल कवडू कुंभलकर(७४ %)
२)प्रल्हाद उत्तम धराडे (६७ %)
इलेक्र्टीकल टेक्नाॅलाॅजी मधून प्रथम दोन असे
१) धनेश किशोर बर्वे(८० %)
२)अविनाश मोहन बरबटे (७९ %)
आॅटोमोबाईल टेक्नाॅलाॅजी
१)विवेक मुलचद कुंभरे (६५ %)
२)सौरभ जनार्दन मेश्राम (६२ %)
श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय ,रामटेक
विज्ञान शाखा – निकाल १०० %
१) नंदिनी नंदकिशोर राहाटे -(७७ % )
२)श्रावणी उमाकांत पोफळी -(७७ %)
कला शाखा
१)श्वेता गंगाधर मोटघरे -(८३ %)
२)किरण देवराव गाडापेले-(७७ %)
राष्र्टीय आदर्श क.महा. रामटेक
विज्ञान शाखा
१) हेमराज दिनेश ठाकरे (७६ %)
२)विराट रूपचंद झोडापे (७० %)
कला शाखा
१) अक्षिता नरेश लोणारे -(८२ %)
२) आरती अंगद मोहारे -(७८ %)
श्री.नरेंद्र तिडके कला व वाणिज्य कनिष्ठ महा.,रामटेक
वाणिज्य शाखा
१) प्राची सुरेश चौधरी -(८२ %)
२)वृषाली सुधाकर घरजाले (७४ %)
कला शाखा
१) निकिता सुरेश दमाहे -(७६ %)
२) साहिल ओमप्रकाश सिनसिनवार (६९ %)
ज्ञानदीप कनिष्ठ महा.शितलवाडी
विज्ञान शाखा
१) अमिष जयेंद्र कडव -(६९ %)
२) प्रथमेश अमर भोगे -(६६ % )
स्व.अॅड.नंदकिशोर जयस्वाल क.महा.,काचुरवाही
कला शाखा
१) सोनिया दिपक वानखेडे -(७७ %)
२) रोशनी गणेश गोल्हर -(७०.४६ %)
तालुक्यातील १०० टक्के निकाल असलेले क.महाविद्यालये
१) समर्थ कनिष्ठ महा.,रामटेक (विज्ञान )
२) श्रीराम कनिष्ठ महा.रामटेक (विज्ञान)
३) गुरूकुल कनिष्ठ महा.देवलापार ( विज्ञान व कला )
४)जि.प.कनिष्ठ महा.,बोथिया पालोरा (कला)
५)प्राॅव्हीडंस कनिष्ठ महा.,मनसर (विज्ञान )
६) मातोश्री काशीदेवी कनिष्ठ महा. मुसेवाडी (कला)
७)स्व.अॅड.नंदकिशोर जयस्वाल क.म.,काचुरवाही (कला)
८)नवजीवन कनिष्ठ महा.पथरई (विज्ञान)
९) नंदिवर्धन कनिष्ठ महा.,नगरधन (वाणिज्य)

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …