*सावनेर मध्ये मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा हौदस*
*सावनेर नगर प्रशासनाच्या उपाययोजना शुन्य,रस्ते अपधाताच्या प्रमाणात वाढ*
मुख्य संपादक- कीशोर ढुंढेले सोबत सावनेर प्रतिनिधि सुरज सेलकर
*सावनेर– शहरातील मुख्य रस्त्यावर दिवसेंदिवस मोकाट जनावरांच्या वाढत्या उपस्थितीमुळे मोठे रस्ते ही आता पदाचार व वाहन चालविण्यासाठी छोटे पडू लागले आहे*

*शहरातील बाजर चौक,गडकरी चौक, गांधी पुतळा,बस स्थानक, नागपूर रोड,तहसील कार्यालय परिसरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे ठान मांडून बसले तसेच भर रस्त्यावर सुसाट धावत दिसने काही नवीन बाब नाही सोबतच या लावारीस जनावरांच्या अचानक वहनापुढे नकळत धावत आडवे येत असल्याने दररोज अनेक किरकोळ व गंभीर स्वरुपाचे अपधातात अनेकांना आपले हातपाय मोडून घ्यावे लागत आहे*

*रस्त्यावर ठान मांडणारे जनावरे हे पूर्णतः लावारीस अथवा बेवारस नसुन यातील अधिकांश जनावरे नगरीतील नागरिकांची असुन त्या जनावरांवर अनेक परीवाराचा उदर निर्वाह ही अवलंबून असल्याचे खात्रीलायक वुत्त असुन सदर जनावरे सकाळी व सायंकाळी आपल्या घरी परततात व जनावरांचा मालक त्याचे दुध काढुन घेतल्यावर त्यांच्या चार्यापाण्याची व्यवस्था न करता परत त्याना घरुण हकलुन लावतात त्यामुळेच भुकेजलेली जनावरे बाजारपेठीसह शहरातील मुख्य रस्त्यावर फीरत असल्याचे वुत्त आहे.अनेक वेळा नगर प्रशासनाने मोकाट जनावरांना पकडून कोंडवाण्यात नेण्याकरिता उपाययोजना केली परंतु दबंग जनावर मालकांच्या दबंगगीरी पुढे पकडलेली जनावरे तशीच सोडून देण्यास विवश होतात*

*सध्याच्या परिस्थितीत स्थानिक नगर प्रशासन कोवीड़19 च्या रोकथाम करीता व्यस्त असल्याने रस्त्यावर सदर मोकट जनावरांच्या संखेत लक्षणीय वाढ होत आहे यावर नगर प्रशासन व मुख्याधिकारी रविंद्र भेलावे यांनी जातीने लक्ष देऊन मोकाट जनावरांना जेरबंद करुण कोंडवाण्यात कोंडून शहरातील रस्ते रहदारीला मोकळे करण्यात यावे तसेच ज्यांची जनावरे परत मुख्य रस्ते, चौक,पटांगण अथवा वर्दळीच्या ठीकाणी आढळल्यास त्या जनावरांच्या मालकावर ही गुन्हे नोदवीण्यात यावा अशी मागणी नागरिकांतुन होत आहे*
Maharashtra News Media सच की आवाज