Breaking News

*नागपूर ग्रामीण गुन्हे वार्ता* *जबरी अनैसर्गिक संभोग* *पो.स्टे.काटोल*

*नागपूर ग्रामीण गुन्हे वार्ता*

*जबरी अनैसर्गिक संभोग*

*पो.स्टे.काटोल*

काटोल*दिनांक 13/07/2020 चे 15:00 वा . ते 16.30 वा . चे सुमारास फिर्यादी यांच्या 7 वर्षीय पिडीत मुलगा याला आरोपी नामे- अजय जयराम कुमरे , वय 18 वर्ष , रा . परसोडी याने अनैसर्गिक संभोग केले . तसेच सदर बाब कुणालाही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली .. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे . काटोल येथे आरोपीविरुध्द कलम 377 , 506 भादवि . सहकलम 4 , 6 बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीला अटक करण्यात आली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सोनाली जगताप 8421401099 या करीत आहे*

*जबरी संभोग*

*पो.स्टे . *वेलतूर*

*दिनांक 09/03/2015 ते दिनांक 03/07/2020 या दरम्यान 33 वर्षीय पीडिते / फिर्यादी व आरोपी नामे- श्रीकांत शांताराम पांढरे , वय 30 वर्ष , नेमणुकः जिल्हा वाहतुक शाखा , नागपुर ग्रामीण हे दोघेही पोलीस विभागात नौकरी करीत असून दोघेही वेग – वेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत . आरोपीने पीडितेला लग्नाचे आमीष दाखवून तिचेसोबत वेळोवेळी शारीरिक सबंध प्रस्थापीत केले . तसेच आरोपीने पीडितेसोबत लग्न न करता तिचा विश्वासघात करून दुस – या मुलीशी लग्न केले . सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे . वेलतुर येथे आरोपीविरुध्द कलम 376 ( 2 ) ( एन ) भादंवि . कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री . किशोर वैरागडे 9923795086 हे करीत आहे*

*लग्नाचे आमीष देऊण जबरी शरिरीक संबंध*

*पो.स्टे *खापरखेडा*

*अंतर्गत 2 कि.मी. अंतरावर 20 वर्षीय पिडीत / फिर्यादी हिचा वाढदिवस असल्याने तो साजरा करायचा आहे असे म्हणुन आरोपी नामे- सुरज संजय वाघमारे , वय 24 वर्ष , रा . चिचोली , वार्ड क्र . 1 याने पीडितेला दुपारी 03.00 ते 03:30 वा . चे सुमारास चिचोली येथे बोलाविले . यावरून पीडिता तिथे गेली असता दवाखानाच्या एका कोपरात केक कापुन वाढदिवस साजरा केला . त्यानंतर त्याने पीडिते सोबत बोलायचे आहे . असे म्हणुन पीडितेला चिचोली येथील दवाखानाच्या पाठीमागे नेवुन पीडितेला लग्नाचे आमीष दाखवुन पीडिते सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापीत केले . त्यानंतर आरोपीने पीडितेला म्हटले की , ” तु सदरची बाब कोणाला सांगीतल्यास तुला जिवाने मारील ” अशी धमकी देवून आरोपी तेथुन निघुन गेला . पुन्हा दिनाक 28/06/2020 रोजी दुपारी 02.00 वा . सुमारास त्याच ठिकाणी आरोपीने पीडितेला बोलवुन ” तीचे सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापीत केले . तसेच दिनांक 10/07/2020 रोजी दुपारी 02.30 वा . सुमारास पीडितेला कोराडी रोडवर बोलवुन तीचे सोबत घडलेल्या प्रकराच्या सबंधाने कुठेही न बोलण्यासाठी हाताने मारहाण करून जिवाण्याची धमकी दिली . सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे . खापरखेडा येथे आरोपीविरुष्द कलम 376 ( 2 ) , ( एन ) , 506 भादवि , कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीला अटक करण्यात आली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास मसपोनि धुमाळ 9970848688 करीत आहे*.

*विनयभंग*

*पो स्टे सावनेर*

*दि . 13/07/2020 2 17:30 वा . चे सुमारास 35 वर्षीय पिडीत / फिर्यादी या कामावरून घरी परत जात असतांना आरोपी नामे- नाना मेटकर , रा . सावनेर याने तीचा विनाकारण पाठलाग करून पीडितेस मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला . तसेच आरोपीने पीडितेस म्हटले की , तु माझ्याशी बोलली नाही तर मी तुझा जिव घेईन ‘ अशी धमकी दिली , सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे . सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम 354 ( ड ) , 506 भादवि , अन्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीचा शोध घेणे सुरू आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली मसपोनि रासकर 9082196080 या करीत आहे . 2 ) पो.स्टे . अरोली दि . 12/07/2020 19.00 वा . चे सुमारास 27 वर्षीय पिडीत / फिर्यादी या कामावरून घरी परत जात असतांना आरोपी नाम- नाना मेटकर , रा . सावनेर याने तीचा विनाकारण पाठलाग करून पीडितेस मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला . तसेच आरोपीने पीडितेस म्हटले की , तु माझ्याशी बोलली नाही तर मी तुझा जिव घेईन ‘ अशी धमकी दिली . सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे , अरोली येथे आरोपीविरुध्द कलम 354 , 323 , 504 , 506 भादवि , अन्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीला अटक करण्यात आली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि चाबुकस्वार 8830000066 हे करीत आहे*

*पो.स्टे . पारशिवनी -*
*दि . 13/07/2020 चे 16.00 वा . चे सुमारास 35 वर्षीय पिडीत / फिर्यादी आरोपी नामे राजेश संभाजी तांदुळकर , रा . दहेगाव जोशी अनाधिकृतपणे प्रवेश करून पीडितेस मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला . तसेच आरोपीने पीडितेस शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली . सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे . पारशिवनी येथे आरोपीविरुष्द कलम 452 , 354 , 323 , 504 , 506 भादवि . अन्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीचा शोध घेणे सुरू आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास मपोहवा संगिता कोवे या करीत आहे .*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …