*जिल्हा परिषद शाळा धुरमुक्त होणार अनोखा कार्यक्रम गँससिलंडरचे वितरण*
कोरपना प्रतिनिधी -गौतम धोटे
कोरपना :- कोरपना पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सांगोळा येतील जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थीचा सर्वांगीण विकास साधण्याचे ध्येय ठेऊन .(महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थीसाठी विद्यार्थ्यांना शाळेची ओळलागण्यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली . या योजणे अंतर्गत शाळेतील प्रत्येक विध्यार्थांना भोजन दिले जाते . या शाळेमध्ये शालेय पोषण आहार शिजविताना स्वयंपाक गृहात लाकडे वापरली जातात .जात होती व त्यामुळे वायु प्रदुषण होतो हा प्रकार बंद हेण्यासाठी ” अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूरने” पुढाकार घेऊन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सांगोडा येथे गँस सिलेंडर वाटप नुकतेच करण्यात आले .ही शाळा आता धुरमुक्त होणार आहेत .
सदर अनोखा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने सांगोडा गावचे सरपंच सचिन बोंडे ,तर अल्ट्राटेकचे विकास अधिकारी संजय पेठकर, ग्रामपंचायत सांगोड्याचे सचिन गोवरदीपे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेंडे, गावातील नागरिक मोठ्या संख्येत आदीची उपस्थिती होती.
Maharashtra News Media सच की आवाज