Breaking News

*रामटेक शहरात माकडांचा भयंकर उपद्रव*

*रामटेक शहरात माकडांचा भयंकर उपद्रव*

रामटेक तालूका प्रतिनिधी ललित कनोजे 

रामटेकगडमंदिर माकडासाठी प्रसिध्द अाहे. प्रत्येक येणारे पर्यटक भगवान राम मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर व रामटेकचे पहाडी चे विविध हिरव्या झाडाने नटलेल्या निसर्गाचे सौंदर्य बघून निश्चित मोहित होतात . माकडांना स्वहस्ते फुटाणे चारण्यात लहान मुले व मोठयांनाअति अानंद होतो. परंतु रामटेक शहरात माकडाचा भयंकर उपद्रव अाहे .लोक ञस्त झाले अाहेत. बंदराचे कळप सकाळ पासून शहरात येतात . दोन कळपामध्ये वर्चस्वाची लढाई होते . लोकांना घरात घूसून पोळया , भाजीपाला पळविणे लोकांना मागे धावने, चावने नित्याचेच झाले अाहे .हया मुळे नागरिक भयभित अाहेत .माकडांचा हल्ली मुक्काम रामटेक शहरामध्येच असतो. जेथे झाडे असतील तेथेउपद्रव मोठा अाहे शहरामध्ये कवेलु चे घरे अाहेत त्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान करतात टीनाचा घराचे कुदने मोटार सायलक ला लाता मारुन पाडणे मोठ्या गाडयांचे टपावर कुदुन नुकसान करतात शहरामध्येघरी असलेल्या फळांचे झाडे लावता येत नाहीत ते तोडून टाकतात . रामटेक सिंधूरागिरी पर्वताने वेडलेला अाहे. या पर्वतावर हिरवगार असून सुध्दा माकड तिथे न थांबता शहरात येतात तसेच शहरा लगत असलेला शेता मधिल भाजीपाला, फळे व झाडांचे नुकसान करतात.

*वनविभाग लक्ष देईल का?*
माकडांचा बंदोबस्त वनविभाने करायला पाहीजे परंतू ते अापल्या जिम्मेदारीतून,हात झटकतात . नागरिकांचे म्हणने अाहे की वनविभागाने शहरातून माकडाला हुसकावून लावले . पाहीजे मागे दोन वर्षा पूर्वी वनविभागाने मोहीम राबवून बंदराला पकडून जंगलात सोडले होते. परंतू काही वन्यप्रेमीनी त्यांचा विरोध केला होता. पण यापूर्वी काही लोकांना अापले जिव गमवावे लागले .ते अाता लोकांना माकडामुळे होणार्‍या उपद्रव विषयी काहीच करीत नाही. लोकांची मागणी अाहे की शहरातून माकडाला हदपार करावे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …