*आमदार सोले कडून मौदा ग्रामीण रुग्णालयास किट वितरण*
*आ.सावरकर यांच्या प्रयत्नांना यश*

*वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता*
उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वत: सुरक्षित राहून रुग्णांची तपासणी व उपचार करता यावा यासाठी या भागाचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या प्रयत्नांने मौदा येथील ग्रामीण रुग्णालयाला पदविधर मतदार संघाचे आमदार प्रा.अनिल सोले यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थे अंतर्गत व निधितुन ‘कोरोना’ आजारावरिल उपाय योजने करिता लागणारे “मास्क, पीपीई किट, सैनिटाइजर, हँड ग्लोज, थर्मामिटर” इत्यादिचे वाटप शनिवार दि.१८ जुलै रोजी करण्यात आले.
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शासकीय रुग्णालय मजबूत करण्यासाठी, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या ‘कोरोना’ उपाय योजने करिता विविध वस्तुंची व्यवस्था पुरविने ही काळाची गरज असल्याचे मत पदवीधर मतदार संघाचे आमदार प्रा.अनिल सोले व्यक्त केले. त्यांनी त्यांच्या स्थानिक निधितुन मौदा ग्रामीण रुग्णालयाला उपयोगी सहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

या प्रसंगी आ.अनिल सोले, आ. टेकचंद सावरकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सोनसरे व त्यांचा स्टाफ तसेच मौदा नगरपंचायत नगराध्यक्षा भारती राजू सोमनाथे, उपाध्यक्षा शालिनी कुहीकर,
गटनेता मुन्ना चलसानी, नगरसेवक देविदास कुंभलकर, सुषमा कुंभलकर, सुनिता पाराशर, वैशाली चौहान, राजु सोमनाथे विमल पोटभरे, राकेश धुर्वे, भाजपा तालुकाध्यक्ष हरीश जैन,
मौदा शहराध्यक्ष प्रकाश येळने, महामंत्री देवराव करड़भाजने, प्रकाश कुहीकर रमेश कुंभलकर, शंकर केळवदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद भोयर, तालुका महिला मोर्चा अध्यक्ष डॉ.नीलिमा घाटोळे, महिला मोर्चा शहर पदाधिकारी योगिता ढबाले, शहर युवा मोर्चा अध्यक्ष देवेंद्र सानगडिकर,
महामंत्री सौरभ खरवड़े, सुभम सहारे, उपाध्यक्ष योगेश अंबागडे, राहुल हटवार, मयूर मलोदे, राजेश ठोंबरे व नागरिक उपस्थित होते.
सोबतच छोटेखानी “वृक्षारोपनाचा” कार्यक्रम ग्रामीण रुग्णालय परिसरात उपस्थित सर्व मान्यवरां तर्फे करण्यात आले.
Maharashtra News Media सच की आवाज