Breaking News

*मोठा अनर्थ टळला ३ वर्षचा मुलगा थोडक्यात बचावला* *विद्युत विभागाचा दुर्लक्ष पना जनतेची विद्युत ट्रान्सफॉर्मर हटवण्याची मागणी*

*मोठा अनर्थ टळला ३ वर्षचा मुलगा थोडक्यात बचावला*

*विद्युत विभागाचा दुर्लक्ष पना जनतेची विद्युत ट्रान्सफॉर्मर हटवण्याची मागणी*

 

कोरपना प्रतिनिधी गौतम धोटे

कोरपनाचंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील दि.१९ जुलै २०२०, गडचांदुर येथील प्रभाग क्रमांक १मध्ये खोब्रागडे यांच्या घरसोमोरील जागेत वीज वितरण कंपनीकडून ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले, मात्र ही ट्रान्सफॉर्मर अगदी जमिनींलगत असून आज एक लहान मुलगा थोडक्यात बचावला आज या ठिकाणीं पुष्कळ लहान मोठी मुले खेळत असतात.असाच एक लहान लहान मुलगा ज्याचे वय अगदी 3 वर्ष आहे तो खेळत खेळत ट्रान्सफॉर्मर जवळ पोहचला आणि त्याचा हाथ ट्रान्सफॉर्मर जवळ जाणार तेवढ्यात दुकानदारचे लक्ष जाऊन धावतपळत तिथुन मुलाला सुखरूप आणले त्यामुळे या घटनेची सर्वत्र पालकात भयभीत वातावरण पसरले आहे. या परिसरारातील ही तिसरी घटना असून तरी पण वीज वितरण कंपनी कडून कोणतीही दख्खल घेण्यात आले नाही .जर का या मुलाला इलेक्ट्रिक शॉक बसला असता त्याला कमी जास्त झाले असते तर याला जिम्मेदार कोण असते .आज या पॉवर ट्रान्सफॉर्मर ची वारंवार येथील जनतेनी वितरण कंपनी ला कळवले पण कुणीही याची दखल घेताना दिसत नाही.याच भागातील ही तिसरी घटना आहेत .आई वडील काम करतात कदाचित मुले बाहेर खेळण्यास जातात पण ही ट्रान्सफॉर्मर एकदम जमिनीसी लागलेली आहेत. लक्ष नसल्यास तेथील मुले हाथ पण लावू शकतो .असे प्रत्येक वेळी या भागात .काही न काही घटना त्या ट्रान्सफॉर्मर मुढे होत आहे जर का ही ट्रान्सफॉर्मर थेथून हटवली नाही तर जनतेनी महावितरण कार्यालया वर मोर्चा काढण्यात येणार असा इशारा येतील रहिवाश्यानी दिला आहे .आज ही ट्रान्सफॉर्मर धोकादायक असून सुध्दा या वर पूर्णतः दुर्लक्ष केले जाते प्रभागातील लहान मुले खेळत असतात ही ट्रान्सफॉर्मर उंचीवर 6 ते 7 फुटावर बसविण्यात यावे नाहीतर ट्रान्सफॉर्मर भोवती तारांचे कुंपण करण्यात यावे, किंव्हा हटवल्या शिवाय उपाय नाही. याची माहिती नगर परिषद उपा्द्यक्ष.शरद भाऊ जोगी यांना देण्यात आली ते येऊन महावितरण ला फोन करून तेथील कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले .त्यांनीं या जागी कंपाऊंड करण्याचे सल्ला दिला पण यावर पाहणी करून ते निघून गेले असाच जर कारभार येथे चालू राहणार तर जनतेला विद्युत मंडळावर मोर्चा काढण्यात भाग पाडत आहे. कमी जास्त झाल्यास महावितरण जिम्मेदार असणार असे येथील जनतेनी आक्रोश व्यक्त केला आहे. ही ट्रान्सफॉर्मर तत्काळ हटवुन देण्याची मागणी येथील जनतेनी केली आहे. यावर  विभाग काय करणार यावर प्रश्नचिन्न जनतेला पडले आहे.हे विशेष
आपन सुरक्षित रहा ..दुसऱ्याना ही सुरक्षित ठेवा

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …