Breaking News

*आर्वीत वीज बिल माफी साठी युवा स्वाभिमान चे स्वाभिमानी सैनिक ई -टॉवरवर*

*आर्वीत वीज बिल माफी साठी युवा स्वाभिमान चे स्वाभिमानी सैनिक ई -टॉवरवर*

प्रतिनिधी- पंकज रोकडे

आर्वीनागरिकांची परिस्थिती आकांताची 4 महिन्याचे सरसकट वीज बिल माफ करा युवा स्वाभिमान ची आंदोलनाद्वारे मागणी, आंदोलनास शेतकरी आरक्षण चे नेते शैलेश अग्रवाल, प्रकल्प ग्रस्त संघर्ष समिती चे राजेश शिरघरे यांची भेट व पाठिंबा.


दिनांक : 20/07/2020 सोमवार रोजी गांधी चौक येथील एस, एस, बी, चॅरिटेबल ट्रस्ट ची आर्वी शहरातील सर्वात उंच इमारतीवरील इंटरनेट टॉवर वर चढून युवा स्वाभिमान पार्टी चे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, यांच्या नेतृत्वात 4 महिन्याचे सरसकट वीज बिल माफ व्हावे या करिता आंदोलक उग्र स्वरूपात आलेले दिसलें, यावेळी दिलीप पोटफोडे, अमरदीप लादे, सिद्धार्थ कळंबे हे ई टॉवर वर चढले, व वीज बिल माफी झालीच पाहिजे च्या घोषणा दिल्या, या पूर्वी सर्व पक्षांनी एकत्र येत सरकार ला 4 महिन्याची सरसकट वीज बिल माफी व्हावी या साठी वीज बिल माफी कृती समिती द्वारा निवेदन दिल्या गेले होत्या त्यांनतर विविध संघटना व पक्षातर्फे वीज बिल माफीची मागणी लावून धरण्यात आली या निमित्ताने, युवा स्वाभिमान पार्टी द्वारा मध्यन्तरी वीज बिलाची होळी करण्यात आली होती तसेच युवा स्वाभिमान पार्टी चे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन वीज बिल माफीची मागणी केली होती तसेच आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी सुद्धा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेत वीज बिल माफी साठी निवेदन दिले व चर्चा केली होती परंतु सरकार द्वारा या संकटात जनतेला वाऱ्यावर सोडणार्या भूमिके मुळे जनतेत प्रचंड आक्रोशमय वातावरण तयार झाले आहे जेंव्हा कि आज परिस्थितीत जनता प्रचंड हालअपेष्टेचे जीवन जगत आहे दोन वेळ चे जेवण भेटण दुभर झाले आहे, मुलांच्या शाळेची फी कशी भरावी, गणवेश कसे घ्यावेत, या चिंतेत पालक आहे अनेक तरुण बेरोजगार झालेत, व्यवसाय पूर्णतः बुडालेले आहे अश्यात आलेले महावितरण चे अवास्तव वाढीब वीज बिलामुडे नागरिकाचे डोळे पांढरे झालेत आणि नागरिकांन तर्फे 4 महिन्याची वीज बिल माफी व्हावी करिता सर्वत्र मागणी होत आहे आणि आज याच मागणी कडे लक्ष वेधण्यासाठी युवा स्वाभिमान पार्टी चे कार्यकर्ते व नागरिकांनी आंदोलन केले, आंदोलनास, बेरोजगार प्रकल्प ग्रस्त संघटना, नाभिक समाजातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला.

यावेळी युवा स्वाभिमान च्या महिला शहराध्यक्ष प्रमिला हत्तीमारे, बेबी दिहाडे, लक्ष्मी वालदे, किरण सोळके, वनिता पवार, उजवला भाटिया, नंदा नरोडे, सलमा शाह, फर्जाना शाह, नीलिमा गोमासे कमला नागोसे, मंदा बाई, अतुल बुरे, दादाराव जिरापुरे, सुरेश वानखेडे, वासुदेव सपकाळ, शन्कर हत्तीमारे, सैदाबी,महेन्द्र मात्रे सचिन दहाट राहुल काडे प्रकाश भोवरे आशिष कदम रवि खंडारे प्रकल्पगरस्त संघटनेच्या वतिने आन्दोलन स्थाडि उपस्थित होते

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …