*गुरुवार पासून चिचोली व वलनी सर्कल अंतर्गत जनता कर्फ्यु*

*पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत सामूहिक निर्णय*
*झालेल्या निर्णयाची माहिती उपविभागीय अधिकारी यांना देणार*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
खापरखेडा:-दिनांक २० जुलै २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार व पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी यांच्या पुढाकाराने परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव बघता चिचोली व वलनी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत असलेले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीत सावनेर पंचायत समिती सभापती सौ अरुणाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे बैठकीला आवर्जून उपस्थित होते सदर बैठकीला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपले मत मांडले परिसरात होत असलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी जनता कर्फ्यु करने आवश्यक असल्याचे सांगितले त्यामुळे दिनांक २३ जुलै २०२० पासून चिचोली व वलनी जिल्हा परिषद अंतर्गत एक आठवडा जनता कर्फ्यु करण्याचा निर्णय घेण्यात आला चिचोली व वलनी जिल्हा परिषद अंतर्गत औषधी दुकाने व्यतिरिक्त ईतर दुकानांची वेळ दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला त्याला उपस्थित मान्यवरांनी आपली सहमती दर्शविली चिचोली व वलनी सर्कल अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतचे सरपंच आपल्या स्तरावर खापरखेडा पोलीस स्टेशन बैठकीत झालेल्या निर्णयाचा संदर्भ देऊन मा उपविभागीय अधिकारी सावनेर याना २१ जुलै २०२० मंगळवार रोजी दुपारी २ वाजता त्यांची वेळ घेऊन कळविणार आहेत.
२३ जुलै गुरुवार पासून होणाऱ्या जनता कर्फ्यु मध्ये सर्व सामान्य नागरिकांना सहभागी होण्याचे आव्हाण करण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव बघता कोरोनावर मात करण्यासाठी जनता कर्फ्यु आवश्यक आहे.
Maharashtra News Media सच की आवाज