*खापरखेडा पुन्हा एक कोरोना पाँझिटिव आढळला*
*औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा च्या संर्पकातला व्यक्ति कोरुना पाँझिटिव*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
*खापरखेडा – शहर मध्ये दिवसें न दिवस कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज दिनांक 20.07.2020 ला पुन्हा 23 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला. 210 X 4 मेगावँट खापरखेडा येथील कार्यरत कंत्राटी कामगार हा कोरोना पाँझिटिव आढळला. दिनांक 19.07.2020 ला या व्यक्तीच्या कोरोना अहवाल पॉझिटिव आला होता. आज कोरोना पाझिटिव व्यक्तिचा घरी जाऊन संपुर्ण परिसर ग्राम पंचायत चिचोली कडून सँनिटायझर करण्यात आले व आजु बाजुचा परिसर सिल बंद करण्यात आला. घटना स्थळी ग्राम पंचायत चिचोली ची संपुर्ण टिम तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र चिचोली व खापरखेडा पोलीस स्टेशन ची संपुर्ण टिम दाखल झालेली आहे. कोरोना पाँझिटिव युवकाला नागपुर येथील शासकिय मेडिकल रूग्णालय येथे पाठविण्यात आलेले आहे.
तसेच कोरोना पाँझिटिव च्या संर्पकांत आलेल्या 9 ते10 लोकांना चिचोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वँब टेस्ट करण्या करिता पाठविण्यात आले आहे.
खापरखेडा औष्णिक विघुत केंद्रात कार्यरत असलेले कामगार च्या संर्पकातला हा 23 वर्षीय कंत्राटी कामगार आहे. या अगोदर सुध्दा खापरखेडा औष्णिक केंद्रात 3 कोरोणा पाझिटिव रूग्ण सापडले आहेत खापरखेडात कोरोना रूग्णाचे नावनिशाण नव्हते सुरूवात औष्णिक विघुत केंद्रापासूनच झाली आता पर्यत एकूण 4 कोरोना पाँझिटिव रूग्ण हे औष्णिक विघुत केंद्रातुनच आढळले आहे जर प्रशासनाने योग्य वेळी योग्य काळजी घेतली असती तर हा प्रकार घडला नसता अशी चर्चा परिसरात होत आहे.*