*आर्वी शहर व ग्रामीण भाजयुमोचा आमदार दादाराव केचे यांच्या मार्गदर्शनात शरद पवारांना ‘जय श्रीराम’* *दिनेश लायचा मिडीया संयोजक वर्धा यांनी राबविला उपक्रम*

*आर्वी शहर व ग्रामीण भाजयुमोचा आमदार दादाराव केचे यांच्या मार्गदर्शनात शरद पवारांना ‘जय श्रीराम’*

*दिनेश लायचा मिडीया संयोजक वर्धा यांनी राबविला उपक्रम*

आर्वी प्रतिनिधी-पंकज रोकडे

आर्वीविधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी निर्देशित केल्या प्रमाणे दिनेश लायचा यांनी आर्वी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना जमवून शरद पवार यांनी अयोध्या येथील राम मंदिरा बाबत केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्याचा निषेध करीत या व्यक्तव्याने हिंदूंच्या मनभावना दुखावल्या गेल्यामुळे केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत ‘जय श्रीराम’ लिहलेले ३००० पोस्टकार्ड राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पाठविले.

“अयोध्येत श्री रामाच मंदिर बांधून कोरोना जाणार नाही”, असे समाजाची दिशा भूल करणारे वक्तव्य खासदार शरदचंद्र पवार यांनी केले.
करोडो भारतीय नागरिकांच्या भावना प्रभू श्रीराम मंदिर उभारणीसाठी जोडल्या गेल्या आहेत, त्या दुखावल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य भाजयुमो अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी त्यामुळे महाराष्ट्रभरातून १०,००,००० ‘जय श्रीराम’ लिहलेले पत्र पाठवून निषेध नोंदविला जात आहे.

या प्रसंगी दिनेश लायचा मिडीया संयोजक वर्धा, मंगेश जोशी उपाध्यक्ष भाजयुमो आर्वी शहर, नितेश मेश्राम वर्धा जिल्हा सचिव भाजयुमो, अश्विन शेंडे, निखिल कडू, कुणाल कोल्हे उपाध्यक्ष भाजयुमो आर्वी तालुका, किशना सातपुते, मिहीर शर्मा, चेतन सातरोटे, सागर गोपाळे, अमित साखरे, रोशन पवार इत्यादींची उपस्थिती होती.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …