Breaking News

*भाजयुमो तर्फे खा.शरद पवार यांना “जय श्रीराम”* *चंद्रपुर जिल्ह्यातील वनसडी येथे भाजयुमो तर्फे निषेध आंदोलन* *चंद्रपुर जिल्हयातून २०हजार पत्रे पाठविणार*

*भाजयुमो तर्फे खा.शरद पवार यांना “जय श्रीराम”*

 

*चंद्रपुर जिल्ह्यातील वनसडी येथे भाजयुमो तर्फे निषेध आंदोलन*

 

*चंद्रपुर जिल्हयातून २०हजार पत्रे पाठविणार*

 

कोरपना प्रतिनिधि गौतम धोटे

कोरपना :- खासदार शरदचंद्र पवार यांनी प्रभू श्रीराम यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा तर्फे कोरपना तालुक्यातील वनसडी येथे निषेध आंदोलन करत खासदार शरद पवार यांना ‘जय श्रीराम’ लिहून हजारो पत्रे पाठविण्यात आले
सदर आंदोलन हे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर,भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील,राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले,भाजयुमो प्रदेश सचिव व चंद्रपुर जिल्हा प्रभारी सोपान कनेरकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा चंद्रपूर च्या माध्यमातून खासदार श्री शरदचंद्र पवार यांनी प्रभू श्रीरामांच्या बद्दल वादग्रस्त विधान केलं की राम मंदिर बांधून कोरोणा जाणार का त्यांच्या या विधानामुळे करोडो लोकांच्या भावना दुखावल्या त्यामुळे पवारांनी केलेल्या चुकीच्या विधानाचा निषेध सर्वत्र महाराष्ट्रभर होत आहे.
खासदार शरद पवार यांच्या विधानामुळे समस्त हिंदू नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याचीच त्यांना जाणीव करून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे ‘जय श्रीराम’ लिहून पाठवीत आहेत असे यावेळी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी सांगितले.
यावेळी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने,उपाध्यक्ष दिनेश सूर,सचिन गुरनुले,ओम पवार,सत्यवान चामाटे,दिनेश खडसे,जगदीश पिंपळकर,पिपरी सरपंच कवडू पाटील कुंभारे,प्रमोद पायघन,राहुल पायघन,नारायण कोल्हे,रामकृष्ण तुरानकर,अरुण पिंपळकर,देवराव कोल्हे,वृषभ तुराणकर जगदीश जरिले,बंडू गोंडे, घनश्याम ताजने, सुशांत आत्राम,शंकर तडस,संतोष अवताडे,रतन ठाकरे,सीताराम मडावी,इंदल राठोड,निखिल पवार,रमेश राठोड,विपुल तोडासे,दुरवास धुर्वे इत्यादी उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …