*BASF ODYSSEY तणनाशक औषधाच्या फवारणीने १० एकरातील भुईमुंग मेला*
*शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ*
*कंपनीने झटकले हात*
नरखेड तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे सोबत पवन कंळबे जलालखेडा
नरखेड – तालुक्यातील मोहगाव (भ.)ता- नरखेड येथील युवा शेतकऱ्याने कळमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्याकडील १२ एकर शेती ठेकापत्र करून पेरली.या शेतीत भुईमुंग पेरला.पेरल्यानंतर या भुईमुंगावर तणनाशकाची फवारणी केली असता १० एकरातील भुईमुंग तणनाशकांचा औषधाने मरण पावल्याने शेतकऱ्याचे अंदाजे पाच ते सहा लाखाचे नुकसान झाले आहे.सततच्या नापिकीने आता हे अजून नवीन संकट आल्यामुळे शेतकऱ्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
माहितीनुसार मोहगाव(भदाडे)येथील युवा शेतकरी निकेश भिमराव टेकाडे यांनी तिष्टी(बु)ता.कळमेश्वर येथील शेतकरी दशरथ यादवराव काळबांडे यांच्याकडील १२ एकर शेती ५०,०००/- रुपये वार्षिक यानुसार ठेकापत्र करून पेरली.ही शेती त्याने उसनवाडी करून पेरली या १२ एकरामधील शेतीत पूर्ण भुईमुंगाचा पेरा केला.शेती पेरण्याकरिता अंदाजे १,५०,०००/- रुपयांचा खर्च केला.भुईमुंग उगवल्याच्या २५ दिवसानंतर १२एकर शेतीपैकी १० एकर शेतात BASF या कंपनीचे Odyssey (ओडिसि)या अौषधाची फरवारणी केली.त्यानंतर ओडिसि हे औषध संपले म्हणून त्याच शेतातील २ एकर शेतात अदामा(ADMA)या कंपनीचे SHAKED(शाकेद)हे औषध फवारणी केली असता १० एकर शेतातील ओडिसि औषधी मारलेला भुईमुंग पूर्णपणे मेला व २ एकरातील भुईमुंगाला काही झाले नाही.
BASF कंपनीचे Odyssey (ओडिसि )औषध हे भुईमुंगावर लेबल क्लेम असलेले औषध आहे.त्यामुळे हा भुईमुंग कसा मरण पावला हा मोठा गहन प्रश्न असून भुईमुंग मरण पावल्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे पाच ते सहा लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.सततच्या नापिकीमुळे आता या संकटात ही भर पडल्यामुळे तरुण शेतकऱ्यावर आता आत्महत्या करण्याची पाळी आली आहे.त्याच १२ एकर शेतीतील १० एकरातील भुईमुंग पूर्णपणे मेला तर त्याच शेतातील दुसऱ्या कंपनीच्या तणनाशकाच्या औषधाने भुईमुंग चांगला असून त्यातील फक्त तणच(गवत)मेले.त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
BSF कंपनीच्या वतीने सदर पिकाचा पंचनामा केला असता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हि आमचे अौषधाची चुक नसुन ते उधई लागल्यामुळे भुईमुंग मेल्याचा निष्कर्ष काढला असून शेतकऱ्यांवर झालेल्या नुसकानी पासून हात झटकले आहे व उडवाउडवीची उत्तरे देत आहे.त्यामुळे या प्रकरणाची चौकशी ही कृषी विभागामार्फत होऊन सदर कंपनी वर गुन्हा नोंदवुन कृषी विभागाने सदर शेतमालाचा पंचनामा करुन शेतकर्याला नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अशी मागणी पीडित शेतकऱ्याने व गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
यह मर रोग का असर है दवा का नही:–
किसान ने बुआई की मूंगफल्ली फसल पर किया गया दवा का छिड़काव बेअसर नही। खेत मे फसल के चार पौधे जीवित है और दो पौधे मरे हुए है। खेत मे होने वाले मर रोग के कीटक का असर है, दवा का नही।
दिलीप केंद्रे, एरिया मैनेजर, नागपुर जिला