Breaking News

*हळदी कुंकु कार्यक्रम संपन्न*

*हळदी कुंकु कार्यक्रम संपन्न*

*सावनेर : मकर संक्रांतीच्या पवित्र सणानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुका सावनेर द्वारे भव्य हळदी कुंकुचे आयोजन पामकोट लॉन येथे आयोजित करण्यात आले*


*या भव्य कार्यक्रमाला क्षेत्राचे आमदार डॉ. आशिषबाबू देशमुख यांच्या पत्नी सौ. आयुश्रीताई आशिष देशमुख, माजी नगराध्यक्षा पल्लवीताई मुलमुले,सौ. मांगळे ताई, सौ. रेखाताई पोटभरे, डॉ.अंकिता बाहेती आदींच्या प्रमुख उपस्थितीत सावनेर तालुका भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या हजारो महिलांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाला भव्यदिव्य केले.*


*याप्रसंगी आपल्या संबोधनातुन सौ. आयुश्री ताई देशमुख म्हणाल्या की, हळदी कुमकुम ही आपली संस्कृती आहे, दरवर्षी मकर संक्रांतीच्या पवित्र सणावर या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आणि प्रत्येक विवाहित स्त्री एकमेकांना हळदी कुंकुम लावून आणि भेटवस्तू देऊन तसेच गुळ खाऊ घालून परस्पर कटुता कमी करण्याचा प्रयत्न करतात. आपण सर्व भगिनींनी परस्पर कटुता दुर सारून आपला धर्म, संस्कृती, कुटुंब, समाज, गाव या सर्वांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून आपले राज्य आणि देश विकसनशील व्हावा. त्यासाठी चूल,मुल स्वयंपाकघर, याबरोबरच समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन काम करावे लागेल, असे हृदयस्पर्शी संबोधन त्यांनी केले.*

*कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांना हळदी, कुमकुम, फराळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणताई मानकर यांनी केले तर भारतीताई आठणकर यांनी आभार व्यक्त केले*


*कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या रेखाताई पोटभरे, छाया ढोले, प्रतिभा गायकवाड, सीमा गुडधे, आयुषी धापके, रुपाली कोहले, मायाताई शंभरकर, प्रमिलाताई मानकर, सीमाताई कुंभलकर, पुजाताई वडचीकर आदींनी परिश्रम घेतले.*

Check Also

*दुखदः निधन – समाजसेवी हितेश बनसोड यांचे वडील व्यापारी नंदकुमार श्रावणजी बनसोड यांचे निधन*

🔊 Listen to this *दुखदः निधन*   *हितज्योती आधार फाऊंडेशनचे समाजसेवी हितेश बनसोड यांचे वडील …