*वीज केंद्रातील कोरोना पॉझिटिव्ह अभियंता निलंबित* *मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात तक्रार* *होम कोरंटाईन काळात दुचाकीवरून मुळगावस जाने भोवले* *राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल*

*वीज केंद्रातील कोरोना पॉझिटिव्ह अभियंता निलंबित*

*मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात तक्रार*

 

*होम कोरंटाईन काळात दुचाकीवरून मुळगावस जाने भोवले*

*राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

खापरखेड़ास्थानिक वीज केंद्रात कार्यरत कनिष्ठ अभियंता २४ जुलैला पॉझिटिव्ह असल्याची माहिती स्थानिक वीज केंद्र प्रशासनाला कळली मात्र यादरम्यान वीज केंद्राच्या वसाहतीत होम क्वारटाईन असतांना दुचाकीने गृह जिल्हा नांदेड गाठले सदर पॉझिटिव्ह अभियंत्याला दुचाकीने नांदेडला जाने चांगलेच भोवले असून २५ जुलै शनिवारला त्यांचे तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे यासंदर्भात वीज केंद्राच्या मुख्य सुरक्षा अधिकारी अशोक भिमराव चिपळे यांच्या तक्रारी वरून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे त्यामुळे वीज केंद्र कर्मचारी वर्गात भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.

 

*५०० मेगावॅट खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील चाचणी उपकरण विभागात ३५ वर्षीय कनिष्ठ अभियंता कार्यरत आहे त्याचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले त्यामुळे तो सुट्टीवर होता यादरम्यान १७ जुलै रोजी दुचाकीने खापरखेडा प्रकाशनगर गाठले प्रकाशनगर वसाहतीत येताच त्याला आवंटीत करण्यात आलेल्या गाळा क्रमांक डी ४८ मध्ये होम क्वारटाईन करण्यात आले यादरम्यान त्यांची २३ जुलै गुरुवारला सावनेर येथे स्वॅब टेस्ट घेण्यात आली, २४ जुलै सायंकाळला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला यानंतर सदर अभियंत्याचा शोध सुरू झाला या अभियंत्याने २४ जुलै शुक्रवारला कोणाचीही परवानगी न घेता मुख्यालय सोडून दुचाकीने नांदेड गाठले होते याची साधी कल्पना स्थानिक वीज केंद्र प्रशासनाला नसल्यामुळे सर्वत्र धावपळ उडाली होती सदर अभियंत्यांने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे उल्लंघन केल्यामुळे कलम १८८, २६९, आणि ५१ ब कलमांव्ये मुख्य सुरक्षा अधिकारी अशोक चिपळे यांच्या तक्रारी वरून २५ जुलै शनिवारला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक वीज केंद्र प्रशासनाने तडकाफडकी निलंबन केले आहे.*

*मुख्य अभियंत्यावर कार्यवाही करा*

-पं.स.सदस्य राहुल तिवारी

नुकताच स्थानिक वीज केंद्रात एक कनिष्ठ अभियंता पॉझिटिव्ह आढळून आला यापूर्वी एका कंत्राटी कामगाराची पत्नी व ४ कंत्राटी कामगार पॉझिटिव्ह आढळून आले पॉझिटिव्ह रुग्णाचे वीज केंद्र कनेक्शन असल्यामुळे तहसीलदार दिपक करांडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन वीज केंद्राची पाहणी असता त्यांना बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वीज केंद्राचे अतिथी गृह चेमरी येथे क्वारटाईन येत असल्याची माहिती मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांनी दिली त्यामुळे पॉझिटिव्ह आढळून आलेल्या अभियंत्यांला चेमरी अतिथीगृहात क्वारटाईन करने अपेक्षित होते मात्र त्यांना आवंटीत करण्यात आलेल्या गाळ्यात होम क्वारटाईन करण्यात आले वीज केंद्राच्या चेमरी अतिथी गृहात बाहेरून आलेले वीज केंद्राचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य क्वारटाईन आहेत मात्र पॉझिटिव्ह अभियंत्याला त्याच्या गाळ्यात का होम क्वारटाईन करण्यात आले हे समजण्या पलीकडे आहे त्यामुळे पॉझिटिव्ह अभियंत्यासह वीज केंद्राचे प्रमुख म्हणून मुख्य अभियंता प्रकाश खंडारे तितकेच जबाबदार असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य राहूल तिवारी यांनी केला आहे त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कार्यवाही करण्यात यावी या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक चंद्रकात काळे यांना दिले असून आंदोलनाचा ईशारा दिला आहे यासंदर्भात सहायक अभियंत्यावर गुन्हे दाखल झाले असून त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले मात्र मुख्य अभियंता यांच्यावर कोणती कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजकीय नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्यामुळे कार्यवाहीची शक्यता नसल्याचे वर्तविण्यात येत आहे.

*वीज केंद्रात तहसिलदारानी केली पाहणी*

खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात ४ कंत्राटी कामगार व एका कंत्राटी कामगाराची पत्नी पॉझिटिव्ह आढळून आली त्या पाठोपाठ वीज केंद्रातील अभियंता पॉझिटिव्ह आढळून आला त्यामुळे सावनेरचे तहसीलदार दिपक करांडे यांनी २६ जुलै रविवारला दुपारच्या सुमारास वीज केंद्राला भेट देऊन अचानक पाहणी केली यावेळी त्यांना कोविड १९ काळात अनेक त्रुटी आढळून आल्या याप्रसंगी त्यांनी मुख्य अभियंता यांची कानउघडणी केल्याची माहिती मिळाली शिवाय वीज केंद्राचे अतिथीगृह चेमरी येथे भेट दिली यावेळी तीन व्यक्ती क्वारटाईन असल्याची माहिती मिळाली उर्वरित व्यक्तींना १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे सुटी देण्यात आल्याचे सांगण्यात आले मात्र कनिष्ठ अभियंत्याला चेमरी अतिथी गृहात क्वारटाईन न करता होम क्वारटाईन का करण्यात आले हा प्रश्न आहेयावेळी तहसीलदार दीपक कारांडे यांच्यासह मुख्य अभियंता प्रकाश खंडारे, खडविकास अधिकारी अनिल नागाने,वनायब तहसीलदार सतीश मिसाळ, पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …