Breaking News

*वर्धा चे पालकमंत्री शुक्रवारला जिल्हयाच्या दौ-यावर* *जिल्हयातील आठही तहसिल कार्यालयाला देणार भेट*

*वर्धा चे पालकमंत्री शुक्रवारला जिल्हयाच्या दौ-यावर*


*जिल्हयातील आठही तहसिल कार्यालयाला देणार भेट*

वर्धा विशेष प्रतिनिधि

वर्धा: – राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार 31 जुलै ला जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे.

सकाळी 8.30 वाजता नागपूर येथून सेलूकडे प्रस्थान करतील. सकाळी 9.30 वाजता तहसिल कार्यालय सेलू येथे आगमन व भेट, सकाळी 10.30 वाजता तहसिल कार्यालय समुद्रपूर येथे भेट, दुपारी 11.30 वाजता हिंगणघाट तहसिल कार्यालय भेट, दुपारी 12.30 वाजता तहसिल कार्यालय वर्धा, दुपारी 1 ते 2 राखीव, दुपारी 2.30 वाजता देवळी तहसिल कार्यालय भेट, दुपारी 3.30 वाजता तहसिल कार्यालय आर्वी भेट, सायंकाळी 4.30 वाजता तहसिल कार्यालय आष्टी भेट , सायंकाळी 5.30 वाजता तहसिल कार्यालय कारंजा भेट व सायंकाळी 6.30 वाजता कारंजा येथून नागपूरकडे प्रस्थान करतील.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …