Breaking News

*मोवाड येथे पाण्याची बिकट समस्या* *सरकारी हॅन्डपंप वापरतो ठेकेदार*

*मोवाड येथे पाण्याची बिकट समस्या*

*सरकारी हॅन्डपंप वापरतो ठेकेदार*

 

नरखेड़ तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे

मोवाडशहरातील डाँ. आंबेडकर वार्ड क्रमांक पाच येथे नळाला पाणी येत नसल्याने येथे पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे .मात्र येथे असलेला हॅन्डपंप हा नागरिकांनसाठी आहे .की ठेकेदारासाठी आहे .हा प्रश्न नागरिक प्रशासनाला विचारत आहे .या हॅन्डपंप मध्ये पाण्याची मोटर टाकुन व पाईप लावून वार्ड नंबर तीन मध्ये चालू असलेले मिनी स्टेडियम बांधकामाला ठेकेदारानी आपल्या अरे रावी व मनमानीने पाणी नेऊन वापर करित आहे. वार्डात मात्र पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे .एकतर नळाला पाणी येत नाही. हॅण्डपंम्प पण नागरिकांन साठी नाही बिल मात्र नगरपरिषद पूर्णताः वसुंल करतात हा अन्याय नाही का? नगरपरिषद प्रशासनाचे याकडे असब्य दुर्लक्ष आहे व कर्मचारी ठेकेदाराची पाठराखण करतात अशी चर्चा वार्डातील नागरिकामध्ये आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांना यांची रीतसर माहिती दिली असता उडवाउडवीची उत्तरे देतात.

 

वार्डातील नागरिकानी अर्जाद्वारे तात्काळ नगरपरिषदेनी हॅन्डपंप नागरिकांनसाठी सुरु करा अशी मागणी वार्डातील नागरिक धोंडबाजी मानेकर, लखन वानखेडे गुणवंत दोडके, गणेश हिवराळे, त्रिवेणी ठोंबरे, देवेन्द्र मानेकर, शामराव दोडके, चंपत मानेकर, आदी समस्त नागरिकांनी केली आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …