Breaking News

*बिग़ ब्रेकींग* *पूर्ती कारखान्यात स्फोट* *पाच कामगारांचा जागीच मृत्यू*

*बिग़ ब्रेकींग*


*पूर्ती कारखान्यात स्फोट*


*पाच कामगारांचा जागीच मृत्यू*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*नागपूर : पूर्ती साखर कारखान्यात स्फोट झाला असल्याचे वुत्त असुन या स्फोटामध्ये कारखान्यातील पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहीती उघडकीस येत असुन सदर पुर्ती हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा साखर कारखाना आहे़.*


*नागपूर जिल्ह्यातील बेला येथे हा कारखाना असुन सदर घटनेत मंगेश प्रभाकर नौकरकर (22), वासुदेव विठ्ठल लडी (30), लिलाधर वामन शेंडे (35), प्रफुल्ल पांडुरंग मोन (25) व सचिन प्रकाश वाघमारे (24) अशी मृतक कर्मचाऱ्यांची नावे आहेत.*


*दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती उघडकीस येत असुन कारखान्यातील बायोगॅस टॅकवर हे कर्मचारी वेल्डींगचे काम करण्यासाठी गेले होते़.काम करताना वेल्डींगची ठिण़गी सदर टँकमध्ये पडल्याने हा दुर्दैवी स्फोट झाला़ ज्यात पाचही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …