*चंद्रपूर जिल्ह्यात 1 कोरोना रुग्णाचा मृत्यू*
वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज 1 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कोरोना आजारामुळे 42 वर्षीय बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील हा कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू आहे. गेल्या 24 तासात आणखी 28 पॉझिटीव्ह पुढे आले असून जिल्हाधिकारी कार्यालयातील आणखी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 551 झाली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 जुलै या 42 वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. आज दुपारी दीडच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला. चंद्रपूर शहरातील रहमत नगर येथील रहिवासी असणारा हा रूग्ण 30 जुलैला रात्री अकरा तीस वाजता दाखल झाला होता. 30 जुलैला गंभीर अवस्थेत रात्री 11.30 वाजता या बाधिताला दाखल करण्यात आले होते असा खुलासा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांनी केला आहे. यासंदर्भात बाधिताच्या परिवाराला माहिती देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज