*अवैध रेती माफियावर कारवाई*
*एकूण 30 लाख 6 हजाराचा माल जप्त*
*खात प्रतिनिधी तुषार कुंजेकर*
खात – गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख यांनी रेतीमाफियावर कारवाई करा नाही तर काही खैर नाही असे पोलीस अधीक्षक यांना ठणकावले त्यामुळे रेती माफियांच्या मुसक्या आवळ्याण्यात आल्या अरोली पोलीस स्टेशन हद्दीत कोदामेंढी येथील सुरू नदीवर जेसीबी च्या सहाय्याने रेती कडून ती ट्रकटर मध्ये अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती अरोली पोलीस स्टेशन ला माहिती मिळताच पोलीस सहायक निरीक्षक विवेक सोनवणे यांनी विभागीय गस्त दरम्यान कारवाई करून जेसीबी, तीन ट्रकटर टाली, तीन ब्रास रेती असा एकूण 30 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त केला अमोल पिसे रा चोखाळा,राजकुमार राऊत रा अरोली, मोरेशवर हटवार रा चोखाळा, नरेंद्र चौधरी रा भांडेवाडी, यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुध्द कलम 379,34,गुन्हा नोंद करण्यात आला पुढील कारवाई पोलीस सहायक निरीक्षक विवेक सोनवणे करीत आहे.