*गांधीवादी गावात दारूड्यांचा धुमाकूळ* *गावची शांतता भंग होण्याच्या मार्गावर* *अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याकरिता महिलांचा यलगार*

*गांधीवादी गावात दारूड्यांचा धुमाकूळ*

*गावची शांतता भंग होण्याच्या मार्गावर*

*अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याकरिता महिलांचा यलगार*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सावनेरः सावनेर तालुक्यातील केळवद ग्रामपंचायत येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर केळवद ग्रामपंचायत च्या वतीने तातडीने लाँकडाऊन ची घोषणा करण्यात आली शिवाय छोटे-मोठे दुकाने बंद करण्यात आली तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे फरमान सोडण्यात आले.*

*गागरी नागरिक ् व्यापार्यांनी ही ग्रामपंचायत ला पुर्ण सहकार्य करत व्यापारी वर्गाने आपली प्रतिष्ठाने गावकऱ्यांनी स्वताला घरीच ठेवले.परंतु गावातील अवैध दारू दुकानावर मात्र कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने व मुबलक प्रमाणात गावात दारू मिळत असल्याने घरातील पुरुष मंडळी व गावातील बेवडे सर्रासपणे दारू ढोकसून घरादारापुढे झींगत व शिवीगाळ करत गावातील शांतता भंग करण्याचे कार्य बेखौपपणे करत असल्यामुळे यावर केळवद परिसरातील महिलांनी रोश प्रदर्शित करून गावात दारूबंदीसाठी एल्गार पुकारला आहे गावातील दारूची दुकाने बंद करण्याच्या मागणीबाबत ठाणेदार सुरेश मट्टामी यांना निवेदन सोपविले आहे*

*कोरोना महामारी मुळे शारीरिक अंतर व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे परिसरात पॉझिटिव रुग्णांची संख्या वाढत आहे अशा गावातील वार्डात गल्लीबोळात वावरतांना दारुचे शौकीन तोंडावर मास्क सुद्धा वापरत नाही, गावात मध्यपी धुमाकूळ घालतात त्यामुळे कोरुना संक्रमणाचा धोका वाढला आहे. नियमांचे सर्रास उल्लंघन होत असतानाही यावर कुठलीही कारवाई होत नाही त्यामुळे अवैध दारू दुकानावर दंडात्मक कारवाई करून लोक वस्तीतील दारूची दुकाने बंद करण्यात यावी किंवा ती गावाबाहेर देण्यात यावी अशी मागणी महिलांनी ठाणेदार सुरेश मट्टामी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे*

*केळवद हे गांधीवादी गाव तसेच दारुबंदी गाव म्हणून नागपूर जिल्हा सह संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जातो येथील परिसरात एकही शासनमान्य देशी विदेशी दारूचे दुकान नाही याचाच फायदा उचलत गावातील प्रत्येक गल्लीबोळात व गुत्यावर अवैधरित्या दारुची सर्रास विक्री अवैधरीत्या होत आहे परंतू याकडे कुणाचेही लक्ष नाही. गावातील अवैध दारु विक्री व त्यातून होणारे वाद यामुळे गावातील शांतता भंग होऊण गांधीवादी गावाला गालबोट लागत असल्याचे खुल्या डोळ्याने बघायला मीळत आहे.*

*ऐकीकडे कोरोना काळात सर्वच व्यवसाय कोलमडून पडली त्याउलट या अवैध दारूच्या व्यवसायातून चांगली कमाई होत असल्याने अनेक युवक या व्यवसायाकडे वळत असल्याची धक्कादायक माहीती पुढे येत आहे*

*निवेदन देते वेळी कमला राऊत, सरस्वती येलेकर,इंदिरा मानकर,कौशल्या खराबे, वनीता सुपारे,वैशाली खराबे, वैशाली नवघरे,मीना तीवारी, मंदा मीलमीले,मीरा उईके, रेखा वानखेडे सह गावातील अनेक महिलांनी उपस्थिती राहुन आपला रोष व्यक्त केला*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …